35.2 C
New Delhi
Sunday, July 5, 2026
Homeमनोरंजन'गल्ली नं. १३' या मराठी चित्रपटाचे उत्कंठावर्धक पोस्टर प्रदर्शित…

‘गल्ली नं. १३’ या मराठी चित्रपटाचे उत्कंठावर्धक पोस्टर प्रदर्शित…

मराठी चित्रपटसृष्टीतील काही सिनेमे सुरुवातीपासूनच उत्सुकता वाढविण्याचे काम करतात. मराठी सिनेसृष्टीची हिच परंपरा जपत आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘गल्ली नं. १३’ हे या चित्रपटाचे शीर्षकच कुतूहल जागविणारे आहे. ‘गल्ली नं. १३’चे पहिले वहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ नेते संपतराव सकाळे, समाधान बोडके पाटील, युवराज आप्पा कोठुळे, नवनाथ नाना कोठुळे, दिलीप चव्हाण, शिवाजी कसबे, भैरू पाटील मुळाने, निर्माते रामनाथ बोडके, निर्मात्या राजश्री बडगुजर, दिग्दर्शक महेंद्र रामभाऊ बोरकर, पिकल एन्टरटेन्मेंटचे समीर दीक्षित, लेखक डॉ. एस. डी. पाटील, संगीतकार रोहित नागभिडे यांच्यासह इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.

आरबी सिनेमॅटिक्सने पिकल एन्टरटेन्मेंटच्या सहाय्याने ‘गल्ली नं. १३’ची प्रस्तुती केली आहे. निर्माते रामनाथ बोडके आणि राजश्री बडगुजर या चित्रपटाचे निर्माते आहेत. निर्माते राम बोडके हे सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असून आरबी सिनेमॅटिक्स अंतर्गत ही त्यांची पहिलीच निर्मिती आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबतच पटकथा व संवादलेखन महेंद्र रामभाऊ बोरकर यांचे आहेत. दिग्दर्शक महेंद्र रामभाऊ बोरकर यांनी मराठी आणि हिंदी भाषांमधील बऱ्याच मालिकांचे लेखन केले आहे. महेंद्र रामभाऊ यांची मराठी, हिंदी आणि इंग्लिश भाषांमध्ये पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांच्या ‘ब्युटिफाईंग रिलेशन्स’ या पुस्तकासाठी गोल्डन बुक पुरस्कार मिळाला आहे.

प्रदर्शित करण्यात आलेल्या चित्रपटाच्या पोस्टरवर नायक पाठमोरा उभा असल्याचे पाहायला मिळते. नायकाने स्टायलीश जॅकेट परिधान केले असून, त्याच्या मागच्या बाजूस वीज पडल्यासारखे दाखवल्याने तो दुभंगल्यासारखा वाटतो. या पोस्टरला शहराची पार्श्वभूमी आहे. पोस्टरवरून चित्रपटात काय पाहायला मिळेल याचा जराही अंदाज येत नाही. ‘गल्ली नं. १३’ ही गोष्ट तरुणाईची असून, यात कुटुंबसंस्था आणि आताच्या समाज व्यवस्थेवर प्रकाश टाकणारे पैलूही पाहायला मिळणार आहेत.

मनोरंजनाचे परिपूर्ण पॅकेज असलेला हा सिनेमा कधी प्रेक्षकांना हसवेल, तर कधी रडवेल. आशयघन कथानकाला सुरेल संगीताची जोड देण्यात आली आहे. कुटुंब, प्रेम, संस्कृती, स्वप्न, विखार या सगळ्या भावनांनी ओतप्रोत भरलेला सिनेमा प्रेक्षकांचे फुल टू मनोरंजन करेल. इतकेच नव्हे तर प्रत्येकाला त्याच्या पहिल्या निरागस प्रेमाची आठवण करून देईल. आताच्या जेन झी पिढीपासून ते ज्येष्ठांपर्यंत निखळ प्रेमाच्या विविध परिभाषा या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न करत असल्याचे मत दिग्दर्शक महेंद्र रामभाऊ बोरकर यांनी व्यक्त केले आहे.

या चित्रपटाची कथा डॉ. एस. डी. पाटील यांची आहे. संगीतकार रोहित नागभिडे या चित्रपटातील गीतांना संगीत देणार आहे. नृत्य दिग्दर्शन प्रज्ञा पाटील करणार असून एपीएच स्टुडिओ पोस्ट प्रॉडकशनची जबाबदारी सांभाळणार आहे. पोस्टर प्रदर्शनाद्वारे ‘गल्ली नं. १३’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. सध्या या चित्रपटातील कलाकारांच्या निवडीची प्रक्रिया सुरू असून, लवकरच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
scattered clouds
35.2 ° C
35.2 °
35.2 °
43 %
2.4kmh
32 %
Sun
43 °
Mon
40 °
Tue
39 °
Wed
40 °
Thu
37 °

Most Popular

Recent Comments