27.8 C
New Delhi
Friday, July 10, 2026
Homeमहाराष्ट्रगुणवत्तेला प्राधान्य देत नवीन प्रशासकीय इमारतीचा प्रकल्प वेळेत पूर्ण करा – महापौर...

गुणवत्तेला प्राधान्य देत नवीन प्रशासकीय इमारतीचा प्रकल्प वेळेत पूर्ण करा – महापौर रवि लांडगे

PIMPARI NEWS | पिंपरी,: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची नवीन प्रशासकीय इमारत ही केवळ एक इमारत नसून नागरिकांना अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि आधुनिक सेवा देणारे केंद्र ठरणार आहे. त्यामुळे कामाची गुणवत्ता अबाधित राखत हा प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करावा. कोणतीही तडजोड न करता दर्जेदार काम व्हावे, यासाठी प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना महापौर रवि लांडगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. RAVI LANDAGE

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या चिंचवड येथील सायन्स पार्कजवळ उभारण्यात येत असलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या सुरू असलेल्या कामकाजाची महापौर रवि लांडगे यांनी आज प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर आढावा घेतला. यावेळी प्रकल्पाच्या प्रगतीची माहिती घेत विविध कामांच्या गुणवत्तेबाबत तसेच प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी आवश्यक त्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

याप्रसंगी नगरसदस्या सुप्रिया चांदगुडे, अनुराधा गोरखे, नगरसदस्य कुशाग्र कदम, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सह शहर अभियंता प्रेरणा सिनकर, अनिल भालसाखळे, कार्यकारी अभियंता संध्या वाघ, बाळू लांडे यांच्यासह विनायक साठे, सुनील पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी महापौर रवि लांडगे यांनी कामाची गुणवत्ता अबाधित ठेवत प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच नागरिकांना अत्याधुनिक आणि सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.

महापौर रवि लांडगे म्हणाले की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची नवीन प्रशासकीय इमारत ही शहराच्या वाढत्या गरजांचा विचार करून उभारली जात असून ती नागरिकांसाठी एक सक्षम, सुटसुटीत आणि तंत्रज्ञानाधारित सेवा केंद्र ठरणार आहे. या प्रकल्पामुळे नागरिकांना विविध विभागांच्या सेवा एकाच छताखाली अधिक जलद, पारदर्शक आणि सोयीस्कर पद्धतीने उपलब्ध होतील. त्यामुळे कामाच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता राखणे आणि निर्धारित वेळेत प्रकल्प पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. प्रशासनाने समन्वयाने काम करत कोणतीही तडजोड न करता दर्जेदार काम पूर्ण करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी इमारतीच्या कामकाजाबाबत माहिती देताना सांगितले की, नवीन इमारतीचे काम नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असून प्रत्येक टप्प्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. गुणवत्ता, सुरक्षा आणि वेळेचे नियोजन या तिन्ही बाबींवर प्रशासनाचा विशेष भर आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणा समन्वयाने काम करत आहे.

मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी यावेळी नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामाच्या प्रगतीबाबत सविस्तर माहिती दिली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
27.8 ° C
27.8 °
27.8 °
77 %
2.1kmh
73 %
Fri
37 °
Sat
42 °
Sun
42 °
Mon
42 °
Tue
39 °

Most Popular

Recent Comments