36.1 C
New Delhi
Thursday, May 28, 2026
Homeताज्या बातम्याक्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

एसएनडीटी पुणे आवारात विविध उपक्रमांचे आयोजन


पुणे -: थोर समाजसुधारक आणि द्रष्टे शिक्षणतज्ञ क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती एसएनडीटी (SNDT) पुणे आवारात उत्साहात साजरी करण्यात आली. जेडीबीआयएमएसआर विभागात प्राचार्य डॉ. गणेश चव्हाण यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. डॉ. चव्हाण यांनी वर्तमान काळात महात्मा फुले यांचे विचार कसे दिशादर्शक आहेत, याबद्दल सखोल विवेचन केले. जातिभेदाचे आव्हान आणि स्त्री शिक्षणाला तात्कालीन समाजाचा असलेला विरोध सहन करून फुले यांनी समाजाला दिशा देण्याचे अतुलनीय कार्य केल्याचे प्राचार्य चव्हाण म्हणाले. महात्मा फुले यांनी शिक्षण, शेती, सामाजिक समता, अंधश्रद्धा निर्मूलन, बांधकाम रचना, तसेच महिला सबलीकरण याविषयी त्याकाळी मांडलेले विचार देशाला आजही दिशादर्शक असल्याचे प्राचार्यांनी नमूद केले.


याप्रसंगी शिक्षणशास्त्र विभागाचे प्राचार्य डॉ. सुभाष पाटील, कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत व्हनकटे, कार्यक्रमाच्या समन्वयक डॉ. विदुला आडकर, तसेच प्राध्यापकवर्ग आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या. प्रा. डॉ. आपटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.


गृहविज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. उपप्राचार्य प्रा. विजयकुमार भवारी आणि प्रा ज्ञानदेव चाबुकस्वार यांनी विद्यार्थिनींना महात्मा फुले यांचा जीवनप्रवास उलगडून सांगितला. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाच्या समन्वयक श्रीमती संगीता गांगुर्डे, तसेच शिक्षकवृंद उपस्थित होता.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
36.1 ° C
36.1 °
36.1 °
23 %
1kmh
0 %
Wed
39 °
Thu
45 °
Fri
44 °
Sat
40 °
Sun
39 °

Most Popular

Recent Comments