36.6 C
New Delhi
Monday, July 13, 2026
Homeमहाराष्ट्रपुणेकरांसाठी महत्त्वाची सूचना!

पुणेकरांसाठी महत्त्वाची सूचना!

‘झेड ब्रिज’ रात्रीच्या वेळेत महिनाभर बंद

पुणे : शहरातील महत्त्वाच्या पुलांपैकी एक असलेला कै. काकासाहेब गाडगीळ पूल (झेड ब्रिज) दुरुस्तीच्या कामामुळे मर्यादित वेळेत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. १० एप्रिल ते ९ मे या कालावधीत दररोज रात्री ११ ते सकाळी ७ या वेळेत हा पूल पूर्णपणे बंद राहील, तर उर्वरित वेळेत वाहतूक सुरळीत सुरू राहणार आहे.

महापालिकेकडून नागरिकांना या कालावधीत रात्रीच्या वेळी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुरुस्तीच्या कामादरम्यान वाहतुकीचा खोळंबा टाळण्यासाठी ही वेळ निश्चित करण्यात आली आहे.

मागील वर्षी पावसाळ्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शहरातील सर्व उड्डाणपुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. या अहवालानुसार एकूण १७ पुलांच्या दुरुस्तीची गरज असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पहिल्या टप्प्यात काही महत्त्वाच्या पुलांची दुरुस्ती पूर्ण करण्यात आली आहे. यात खडकवासला पूल, कृषी महाविद्यालय परिसरातील पूल, संभाजी पूल आणि दांडेकर पूल यांचा समावेश आहे.

आता दुसऱ्या टप्प्यातील कामांना सुरुवात करण्यात आली असून, त्याअंतर्गत गाडगीळ पूल (झेड ब्रिज) दुरुस्तीसाठी घेण्यात आला आहे. या पुलावर एक्स्पान्शन जॉइंट आणि बेअरिंगची दुरुस्ती केली जाणार आहे, जी पुलाच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

महापालिकेच्या प्रकल्प विभागाचे प्रमुख दिनकर गोजारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहतूक पोलिसांच्या समन्वयाने हे काम करण्यात येणार आहे. दिवसभर वाहतूक सुरू ठेवत केवळ रात्रीच्या वेळेतच दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार नाही, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

दरम्यान, या कालावधीत रात्री प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी नियोजनपूर्वक पर्यायी मार्गांचा वापर करावा, तसेच वाहतूक नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
36.6 ° C
36.6 °
36.6 °
34 %
4.3kmh
68 %
Sun
37 °
Mon
42 °
Tue
42 °
Wed
42 °
Thu
42 °

Most Popular

Recent Comments