इंदापूर –
इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब ता. इंदापूर महाविद्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक काळंगे यांनी पुष्पहार अर्पण करून केले . यावेळी उपप्राचार्य प्रशांत शिंदे ,उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग ,प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य डॉ अशोक काळंगे यांनी आपल्या मार्गदर्शनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी बाबासाहेबांनी शिक्षण, समता, बंधुता आणि सामाजिक न्यायासाठी दिलेल्या संघर्षाचे महत्त्व अधोरेखित केले. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा संदेश विद्यार्थ्यांनी अंगीकारावा, असे आवाहन त्यांनी केले.
उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग यांनी आपल्या भाषणात बाबासाहेबांच्या पत्रकारितेवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, समाजातील वंचित, शोषित घटकांचा आवाज बुलंद करण्यासाठी बाबासाहेबांनी पत्रकारितेचा प्रभावी वापर केला.
यावेळी बाबासाहेबांनी सुरू केलेल्या मूकनायक या वृत्तपत्राबाबत माहिती देताना, “बहिष्कृत समाजाचा आवाज” ही त्याची भूमिका स्पष्ट करण्यात आली. तसेच बहिष्कृत भारत या वृत्तपत्राच्या माध्यमातून सामाजिक अन्यायाविरुद्ध लढा देत जनजागृती कशी केली, याचे उदाहरण सांगण्यात आले. या वृत्तपत्रांची टॅगलाईन व उद्दिष्टे समजावून सांगण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
RELATED ARTICLES
New Delhi
broken clouds
39.1
°
C
39.1
°
39.1
°
29 %
2.5kmh
65 %
Wed
39
°
Thu
42
°
Fri
41
°
Sat
39
°
Sun
39
°


