27.4 C
New Delhi
Thursday, October 9, 2025
Homeमहाराष्ट्रशक्तिप्रदर्शनाने मुरलीधर मोहोळ यांचा अर्ज दाखल

शक्तिप्रदर्शनाने मुरलीधर मोहोळ यांचा अर्ज दाखल

पुणे –  कोथरुड येथील छत्रपती श्री. शिवाजी महाराजांचे स्मारक ते डेक्कन जिमखाना परिसरातील छत्रपती श्री. संभाजी महाराज यांचे स्मारक अशी महर्षी कर्वे रस्त्यावर पदयात्रा काढून पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी   शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.

कोथरुड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला सकाळी साडेनऊ वाजता पुष्पहार अर्पण करून मोहोळ यांच्या पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पुणे शहराच्या विविध भागांतील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय आणि महायुतीतील घटक पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या सह शहरातील महायुतीचे सर्व आमदार आणि महायुतीचे प्रमुख पदाधिकारी पदयात्रेत सहभागी झाले होते. सुमारे चार तास पदयात्रा सुरू होती. महर्षी धोफ्लडो केशव कर्वे पुतळा, श्री मृत्युंजयेश्वर मंदिर, श्री दशभुजा गणपती मंदिर, नळस्टॉप मेट्रो स्टेशन, गरवारे महाविद्यालय, स्वातंत्र्यवीर स्मारक या मार्गे खंडोजीबाबा चौकात पदयात्रेचा जाहीर सभेने समारोप झाला.

प्रचारसभा सुरू असताना महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पुणे लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या कार्यालयाकडे रवाना झाले. मंत्री चंद्रकांतदादा पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, आमदार माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, चेतन तुपे, सुनील टिंगरे, माजी आमदार योगेश टिळेकर, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अजय भोसले, मनसे नेते बाबू वागस्कर, राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहर अध्यक्ष दीपक मानकर, शिवसेनेचे शहर अध्यक्ष नाना भानगिरे, मनसेचे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर, आरपीआयचे शहर अध्यक्ष संजय सोनावणे या वेळी उपस्थित होते. त्या दरम्यान खंडोजीबाबा चौकातील जाहीर सभेत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची भाषणे झाली. छत्रपती श्री. संभाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून सांगता सभेचा समारोप झाला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
27.4 ° C
27.4 °
27.4 °
32 %
4.2kmh
0 %
Thu
30 °
Fri
31 °
Sat
33 °
Sun
33 °
Mon
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!