38.6 C
New Delhi
Wednesday, June 17, 2026
HomePhoto of the dayऐतिहासिक शनिवारवाडा परिसरात अचानक आग

ऐतिहासिक शनिवारवाडा परिसरात अचानक आग

अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी

पुणे  –  पुणे शहरातील ऐतिहासिक वारसा असलेल्या शनिवारवाडा परिसरात गुरुवारी दुपारी अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. पुण्यातील ऐतिहासिक वास्तू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शनिवारवाडा परिसरात आज दुपारी अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शनिवारवाड्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ साचलेला कचरा आणि वाळलेल्या लाकडांनी अचानक पेट घेतल्याने आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दुपारी सुमारे साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.आग लागल्यानंतर काही क्षणांतच परिसरात धुराचे मोठे लोट पसरले. अंदाजे ४० ते ५० मीटरपर्यंत धूर पसरल्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तत्काळ अग्निशमन दलाला कळवले.माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी प्रयत्न करत असून परिसर सुरक्षित करण्याचे काम सुरू आहे. आगीचा फैलाव होऊ नये यासाठी खबरदारीची पावले उचलण्यात आली आहेत.दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी सध्या पुण्यात वाढलेले तापमान आणि कडाक्याच्या उन्हामुळे वाळलेला कचरा व लाकडे पेट घेतल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेनंतर शनिवारवाडा परिसरातील सुरक्षेबाबतही प्रश्न उपस्थित होत असून संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू करण्यात आला .

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
38.6 ° C
38.6 °
38.6 °
23 %
2.7kmh
1 %
Wed
39 °
Thu
41 °
Fri
42 °
Sat
42 °
Sun
42 °

Most Popular

Recent Comments