24.1 C
New Delhi
Sunday, May 31, 2026
HomeTop Five Newsअश्व क्षेत्राला मिळेल उभारीराज्य सरकार संस्थाशी करणार सामंजस्य करार

अश्व क्षेत्राला मिळेल उभारीराज्य सरकार संस्थाशी करणार सामंजस्य करार


पशुसंवर्धन आणि दुग्व्यवसाय मंत्री पंकजा मुंडे यांची घोषणा
इक्वाइन कलेक्टिव्ह आयोजित द इक्वेस्ट्रियन राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

पुणे, ः अश्व क्षेत्रांच्या परिसंस्थेला उभारी देण्यासाठी राज्य सरकार विविध संस्थाशीं सहकार्य करण्यास आणि विद्यापीठांशी जोडले जाण्यास तत्पर असेल. त्यासाठी संस्थांशी सामंजस्य करार करण्याची घोषणा महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिच्या अधिपत्याखालील द इक्वाईन कलेक्टिव्ह या संस्थेच्या वतिने आयोजित करण्यात आलेल्या द इक्वेस्ट्रियन फोरम २०२६ या राष्ट्रीय स्तरावरील परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या.
या परिषदेचे उदघाटन प्रसंगी राज्य सरकारच्या पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच द इक्वाइन कलेक्टिव्हच्या संस्थापिका  गायत्री कराड, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड, कार्यकारी संचालिका  डॉ. आदिती राहुल कराड, नॅशनल हॉर्स ब्रीडिंग सोसायटी ऑफ इंडियाचे डॉ. एफ. एफ. वाडिया व जयपाल सिंग रावल उपस्थित होते.


पंकजा मुंडे म्हणाल्या, या क्षेत्रात केवळ क्रीडा नाही तर ग्रामीण विकास, पर्यावरण आणि रोजगार निर्मितीमध्ये प्रचंड क्षमता दडलेली आहे. नव्या कल्पना नेहमीच आव्हानात्मक असून ते शक्तीशाली असते. अश्व क्षेत्रासाठी सामूहिक दृष्टिकोन स्वीकारण्याची ही संकल्पना अत्यंत समायोचित आणि आवश्यक आहे.
गायत्री कराड म्हणाल्या, देशात अश्व क्षेत्र हे तिनशे अब्ज डॉलर्सचे मूल्य असलेले जागतिक अश्व परिसंस्थेचा एक भाग आहे. परंतू ते अद्याप ही असंघटित अवस्थेत आहे. या क्षेत्रातील कार्यरत मुनष्यबळाला औपचारिक प्रशिक्षण आणि प्रमाणिकरणाचा अभाव दिसून येत आहे. द इक्वेस्ट्रियन फोरमच्या माध्यमातून कौशल्य, विकास कामाचे प्रमाणीकरण आणि दीर्घकालीन करिअरच्या संधी उपलब्ध करुन देणारे एक व्यासपीठ उभारू. या क्षेत्रात कार्यरत हजारो लोकांसाठी शाश्वत संधी निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहोत.

जयकुमार रावल म्हणाले,  “मानव आणि घोडे यांच्यातील नाते हे विश्वास, शिस्त आणि भावनिक बंधावर आधारलेले आहे. भारताला अश्व क्षेत्राचा समृद्ध वारसा लाभला आहे; या क्षेत्राचे आधुनिकीकरण करतानाच, हा वारसा जतन करणे आणि त्याचा प्रचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अश्व पैदास, अश्व पर्यटन, पशुवैद्यकीय सेवा आणि प्रशिक्षण यांसारख्या क्षेत्रांमध्ये विकासाची मोठी क्षमता उपलब्ध आहे.”

डॉ. राहुल व्ही. कराड म्हणाले, “‘द इक्वेस्ट्रियन फोरम’  सारख्या मंचांच्या माध्यमातून, एमआयटी डब्ल्यूपियूचे उद्दिष्ट शिक्षण, प्राणी कल्याण, क्रीडा विज्ञान आणि नाविन्य  यांना परस्परांशी जोडून भारताची ‘इक्वेस्ट्रियन इकोसिस्टम’ अधिक बळकट करणे हे आहे. शाश्वत विकासासाठी शैक्षणिक संस्था, शासन आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील सहकार्य अनिवार्य आहे.”

उद्घाटन सत्रानंतर ‘धोरण आणि प्रशासन’ या विषयावर एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले. यामध्ये अश्व उद्योगाचे ‘रीब्रँडिंग’ (पुर्न प्रतिष्ठापना) आणि सक्षमीकरण करण्यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार सायरस मदन यांनी सूत्रसंचालन केलेल्या या चर्चासत्रात पंकजा मुंडे,  जयकुमार रावल, ‘नॅशनल हॉर्स ब्रीडिंग सोसायटी ऑफ इंडिया’चे अध्यक्ष डॉ. फारुख वाडिया आणि चंदीगड येथील अश्व शल्यचिकित्सक डॉ. अनहद सिद्धू यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रविकुमार साहू यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
24.1 ° C
24.1 °
24.1 °
73 %
3.1kmh
6 %
Sun
35 °
Mon
38 °
Tue
42 °
Wed
43 °
Thu
43 °

Most Popular

Recent Comments