34.1 C
New Delhi
Saturday, May 30, 2026
HomeTop Five Newsगोव्यात ‘शोध मराठी मनाचे जागतिक संमेलन’ उत्साहात संपन्न

गोव्यात ‘शोध मराठी मनाचे जागतिक संमेलन’ उत्साहात संपन्न

शोध मराठी मनाचे जागतिक संमेलन





गोवा येथील मराठी कला अकादमीत पार पडलेल्या शोध मराठी मनाचे जागतिक संमेलन या भव्य कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला.
प्रास्ताविक करताना मराठी अकादमीचे अध्यक्ष अनिल सामंत म्हणाले,
“माझ्या गोव्याच्या भूमीत येते चांदणे माहेरा”—ही अनुभूती घेण्यासाठी जगभरातील मराठी माणसे या संमेलनासाठी एकत्र आली आहेत. विविध क्षेत्रांत आपल्या कार्याने नाव कमावलेल्या मान्यवरांशी होणारा संवाद गोव्यातील तरुणांसाठी दिशादर्शक ठरेल. झाडावर पाणी मारून चालत नाही, मुळाशी पाणी घालावे लागते—हेच कार्य शोध मराठी मन या संकल्पनेतून होणार आहे. आजच्या तरुणांकडे गती आहे, मात्र दिशा नाही; ती दिशा या संमेलनातून मिळेल.


रामदास फुटाणे आणि उदय लाड यांनी आपल्या प्रस्तावनेतून संमेलनाचा उद्देश स्पष्ट केला. तरुणांच्या हाताला काम मिळावे, उद्योग व रोजगारासाठी प्रेरणा मिळावी, हाच या संमेलनाचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्घाटन सोहळ्यास गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उद्घाटक म्हणून उपस्थित होते. संमेलनाध्यक्ष म्हणून डॉ. अनिल काकोडकर, तसेच उद्योजक अनिल खवटे, जयराज साळगांवकर, महेश मांजरेकर, कला अकादमीचे अध्यक्ष चंद्रकांत कवळेकर, नागराज मंजुळे, आय.एम.बी.चे दशरथ परब, यशवंत गडाख-पाटील, श्यामकांत देवरे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
यावेळी कला जीवन गौरव पुरस्कार प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना, तर जागतिक मराठी उद्योजक पुरस्कार उद्योजक अनिल खवटे यांना संमेलनाध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
तसेच किरण ठाकूर, सुरेश प्रभुदेसाई, डॉ. शिरीष बोरकर, राजेंद्र देसाई, अशोक परब यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
अमेरिकेतील खासदार श्रीनिवास ठाणेदार यांनी ऑनलाईन संदेशातून मराठी तरुणांनी राजकारण व उद्योग क्षेत्रात पुढे येऊन आपली स्वप्ने पूर्ण करावीत, असे आवाहन केले. त्यानंतर आशिष शेलार यांनीही ऑनलाईन मनोगत व्यक्त केले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या भाषणात सांगितले की, भूतकाळाचा वारसा जपत वर्तमानाचे वास्तव स्वीकारून भविष्याचा वेध घेणारी शोध मराठी मन ही संकल्पना आहे. भाषा केवळ संवादाचे साधन नसून ती साहित्य, संशोधन आणि राजकारण समृद्ध करणारी शक्ती आहे. या संमेलनातून नवे विचारप्रवाह निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
34.1 ° C
34.1 °
34.1 °
38 %
6.2kmh
0 %
Sat
36 °
Sun
40 °
Mon
40 °
Tue
42 °
Wed
43 °

Most Popular

Recent Comments