36.1 C
New Delhi
Wednesday, May 13, 2026
HomeTop Five Newsज्येष्ठ गायिका आशा भोसले रुग्णालयात

ज्येष्ठ गायिका आशा भोसले रुग्णालयात

मुंबई : भारतीय संगीतविश्वातील दिग्गज पार्श्वगायिका आशा भोसले यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. शनिवारी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले असून सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. मात्र त्यांच्या प्रकृती अस्वस्थतेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

९२ वर्षीय आशा भोसले या गेली आठ दशकांहून अधिक काळ भारतीय चित्रपटसृष्टीत सक्रिय राहिलेल्या आणि आपल्या बहुआयामी गायकीने रसिकांची मने जिंकणाऱ्या कलाकार म्हणून ओळखल्या जातात. वयाची नव्वदी ओलांडल्यानंतरही त्यांनी आपल्या कार्यातील ऊर्जा कायम ठेवली आहे.

२०२३ मध्ये दुबई येथे त्यांनी आपल्या नव्वदाव्या वाढदिवसानिमित्त विशेष लाइव्ह कॉन्सर्ट आयोजित केला होता. या कार्यक्रमात त्यांनी आपल्या गाण्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले होते. त्यानंतरही देशभरातील विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेत त्यांनी रसिकांशी नाते जपले.

गेल्या वर्षी मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमातही त्यांनी हजेरी लावत शुद्ध मराठी भाषेच्या वापरावर भर दिला होता. समाजात दैनंदिन व्यवहारात मराठीचा अधिक वापर व्हावा, असे त्यांनी आवाहन केले होते.

मात्र, मागील काही महिन्यांपासून त्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये कमी दिसत होत्या. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू होती. अशातच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती येण्याची प्रतीक्षा असून, त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशीच प्रार्थना चाहत्यांकडून केली जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
36.1 ° C
36.1 °
36.1 °
38 %
2.6kmh
20 %
Wed
37 °
Thu
45 °
Fri
45 °
Sat
44 °
Sun
46 °

Most Popular

Recent Comments