29.1 C
New Delhi
Thursday, April 9, 2026
HomeTop Five Newsपुण्यात एकाच वेळी ४२ ठिकाणी जल स्वच्छता मोहीम संपन्न

पुण्यात एकाच वेळी ४२ ठिकाणी जल स्वच्छता मोहीम संपन्न

प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’पुणे,- : जेव्हा सेवा हीच साधना ठरते आणि निसर्गाविषयी संवेदनशीलता जीवनाचा मूलमंत्र बनते, तेव्हा समाजाला नवी दिशा देणारे पवित्र संकल्प जन्माला येतात. मानवसेवा व लोककल्याणाच्या या दिव्य भावनेला साकार रूप देत संत निरंकारी मिशनच्या वतीने ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या अभियानाच्या चौथ्या टप्प्याचे आयोजन रविवार, 22 फेब्रुवारी 2026, सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत, परम श्रद्धेय सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज एवं निरंकारी राजपिता रमीत जी यांच्या पावन मार्गदर्शनाखाली संपूर्ण भारतभर एकाच वेळी राबविण्यात आले.

या अभियाना अंतर्गत पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी, मुळा, मुठा, भीमा, भामा, घोडनदी, पवना, वेळू, कुकरी, मिना, कऱ्हा, मांडवी, आनंदी या नद्यांसह शहरातील विविध तलाव अशा ४२ ठिकाणी ही मोहीम राबविण्यात आली. या अभियानांतर्गत पुण्यामध्ये मुळा मुठा नदीच्या विविध घाटांवर विशाल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

संत निरंकारी मंडळाचे नंदकुमार झांबरे यांनी माहिती देताना सांगितले की, हा विशाल उपक्रम देशभरातील 1600 हून अधिक ठिकाणी तसेच पुण्यामध्ये ४२ ठिकाणी एकाच वेळी या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.

पाणी हे केवळ एक साधन नसून जीवनाचा आधार आणि ईश्वराची अमूल्य देणगी आहे त्याचे संरक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे नैतिक कर्तव्य आहे हि जागृती समाजामध्ये निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. संत निरंकारी मिशनने बाबा हरदेव सिंह जी यांच्या प्रेरणादायी शिकवणी आत्मसात करून सन 2023 मध्ये संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहकार्याने ‘प्रोजेक्ट अमृत’ची सुरुवात केली होती. जलसंवर्धन हा उपक्रम केवळ एखाद्या दिवसापुरता किंवा मर्यादित मोहिमेपुरता न ठेवता, तो एक जीवनशैली, संस्कार आणि सेवाभाव म्हणून स्वीकारण्याची प्रेरणा बनेल — जिथे स्वच्छ जलातून स्वच्छ मन आणि स्वच्छ समाज घडू शकेल.

सतगुरु माताजींचा संदेश सदैव हाच राहिला आहे की, आपण ही पृथ्वी पुढील पिढ्यांसाठी अधिक सुंदर, स्वच्छ आणि संतुलित स्वरूपात जपून ठेवली पाहिजे. ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ हे अभियान त्या पवित्र संकल्पाचे मूर्त स्वरूप आहे, जे समाजाला निसर्ग, समाज व आत्म्याशी जोडून करुणा, समतोल आणि सौहार्दपूर्ण भविष्याच्या दिशेने पुढे नेण्याचे काम करेल.

स्वछता अभियान संपन्न झाल्यानंतर त्याच ठिकाणी विशाल सत्संग चे देखील आयोजन करण्यात आले होते . त्यामधून बाहेरील स्वच्छतेबरोबरच मनाच्या आंतरिक शुद्धीचा संदेश आध्यात्मिक विचारधारेतून देण्यात आला.२२ फेब्रुवारी 2026 : जेव्हा सेवा हीच साधना ठरते आणि निसर्गाविषयी संवेदनशीलता जीवनाचा मूलमंत्र बनते, तेव्हा समाजाला नवी दिशा देणारे पवित्र संकल्प जन्माला येतात. मानवसेवा व लोककल्याणाच्या या दिव्य भावनेला साकार रूप देत संत निरंकारी मिशनच्या वतीने ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या अभियानाच्या चौथ्या टप्प्याचे आयोजन रविवार, 22 फेब्रुवारी 2026, सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत, परम श्रद्धेय सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज एवं निरंकारी राजपिता रमीत जी यांच्या पावन मार्गदर्शनाखाली संपूर्ण भारतभर एकाच वेळी राबविण्यात आले.
या अभियाना अंतर्गत पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी, मुळा, मुठा, भीमा, भामा, घोडनदी, पवना, वेळू, कुकरी, मिना, कऱ्हा, मांडवी, आनंदी या नद्यांसह शहरातील विविध तलाव अशा ४२ ठिकाणी ही मोहीम राबविण्यात आली. या अभियानांतर्गत पुण्यामध्ये मुळा मुठा नदीच्या विविध घाटांवर विशाल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
संत निरंकारी मंडळाचे नंदकुमार झांबरे यांनी माहिती देताना सांगितले की, हा विशाल उपक्रम देशभरातील 1600 हून अधिक ठिकाणी तसेच पुण्यामध्ये ४२ ठिकाणी एकाच वेळी या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.
पाणी हे केवळ एक साधन नसून जीवनाचा आधार आणि ईश्वराची अमूल्य देणगी आहे त्याचे संरक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे नैतिक कर्तव्य आहे हि जागृती समाजामध्ये निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. संत निरंकारी मिशनने बाबा हरदेव सिंह जी यांच्या प्रेरणादायी शिकवणी आत्मसात करून सन 2023 मध्ये संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहकार्याने ‘प्रोजेक्ट अमृत’ची सुरुवात केली होती. जलसंवर्धन हा उपक्रम केवळ एखाद्या दिवसापुरता किंवा मर्यादित मोहिमेपुरता न ठेवता, तो एक जीवनशैली, संस्कार आणि सेवाभाव म्हणून स्वीकारण्याची प्रेरणा बनेल — जिथे स्वच्छ जलातून स्वच्छ मन आणि स्वच्छ समाज घडू शकेल.
सतगुरु माताजींचा संदेश सदैव हाच राहिला आहे की, आपण ही पृथ्वी पुढील पिढ्यांसाठी अधिक सुंदर, स्वच्छ आणि संतुलित स्वरूपात जपून ठेवली पाहिजे. ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ हे अभियान त्या पवित्र संकल्पाचे मूर्त स्वरूप आहे, जे समाजाला निसर्ग, समाज व आत्म्याशी जोडून करुणा, समतोल आणि सौहार्दपूर्ण भविष्याच्या दिशेने पुढे नेण्याचे काम करेल.
स्वछता अभियान संपन्न झाल्यानंतर त्याच ठिकाणी विशाल सत्संग चे देखील आयोजन करण्यात आले होते . त्यामधून बाहेरील स्वच्छतेबरोबरच मनाच्या आंतरिक शुद्धीचा संदेश आध्यात्मिक विचारधारेतून देण्यात आला

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
scattered clouds
29.1 ° C
29.1 °
29.1 °
26 %
3.6kmh
40 %
Thu
28 °
Fri
34 °
Sat
36 °
Sun
36 °
Mon
38 °

Most Popular

Recent Comments