35.3 C
New Delhi
Monday, July 13, 2026
HomeTop Five News‘नेशन फर्स्ट’ भावनेने लाखो तरूणांनी राजकारणात यावे- भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरूण चुघ

‘नेशन फर्स्ट’ भावनेने लाखो तरूणांनी राजकारणात यावे- भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरूण चुघ

१५ व्या भारतीय छात्र संसदेत याचे आवाहन

पुणे, : ” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘नेशन फर्स्ट’ या भावनेला लक्षात ठेवून १ लाख तरुणांना राजकारणात येण्याचे आणि देशाची सूत्रे स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. आपण प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्टतेसाठी प्रयत्न केले पाहिजेत. २०४७ पर्यंत विकसित भारत निर्माण करणे हे आपले ध्येय आहे. ही आपली मातृभूमी आणि आपली कार्यभूमी आहे. जगभरात भारताचे गौरव करण्यासाठी युवकांनी पुढे यावे.” असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुघ यांनी केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या १५ व्या भारतीय छात्र संसदेच्या दुसर्‍या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांनी भूषविले.तसेच विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस उपस्थित होते.


तरुण चुघ म्हणाले,” लोकशाही हा देशाचा आत्मा आहे. म्हणून तरुणांनी त्याचे रक्षक म्हणून काम केले पाहिजे. सध्याच्या युगात देश वेगाने प्रगती करत आहे. जागतिक स्तरावर भारताचे स्थान उंचावले आहे. ते वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणूनही उदयास येत आहे. एक काळ असा होता जेव्हा हा देश जगाकडून मागणी करत असे परंतु गेल्या १२ वर्षात ही मागणी थांबली आहे. त्यामुळे जगभरातील देश भारताशी जोडले जाऊ इच्छितात. आता देशाची प्रतिमा जागतिक स्तरावर स्पष्टपणे दिसून येते. या देशात सर्वात जास्त संधी आहेत, पुढे जाण्याचे धाडस आहे आणि जगासाठी सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून उदयास आले आहे.”
“भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता कशी काम करेल यावर चर्चा करण्यासाठी लाखो लोक दिल्लीत झालेल्या एआय समिटमध्ये आले होते. युवकच आता ठरवतील की जगात भारत कुठे आणि कसा असेल. २१ वे शतक भारताचे आहे. जगात भारतात सर्वात जास्त स्टार्टअप्स आहेत. म्हणून युवकांना विनंती करतो की ही वेळ थांबण्याची नाही, तर पुढे जाण्याची आणि आव्हानांना स्वीकारण्याची आहे.”
“भारताने शतकानुशतके प्रगती केली आहे, इतिहास याची साक्ष देतो. जेव्हा अलेक्झांडर, मुघल आणि ब्रिटिशांनी आपली ताकद दाखवली तेव्हा देशवासीयांनी त्यांचा पराभव केला. स्वातंत्र्यानंतर जय जवान, जया किसान हा नारा दिला गेला. १९६५ आणि १९७१ ची युद्धे देखील याची साक्ष देतात. भारतातील तरुण सर्वत्र पुढे आले आहेत.”
“विद्यार्थी उदयाचे नाहीत तर आजचे नागरिक आहेत. देशाच्या समस्या समजून घेणे आणि त्यावर उपाय शोधणे ही केवळ सरकारची जबाबदारी नाही तर देशाच्या नागरिकांचीही जबाबदारी आहे. देशातील प्रत्येक मोठ्या बदलामागे तरुणाईची शक्ती आहे.”
तरुण चुघ यांनी युवकांना विकसित भारताच्या संकल्पाने पुढे जाण्याचे आवाहन केले. या देशाला सर्वात बलवान बनण्याचा आणि सर्वांना मानवतेच्या मार्गावर आणण्याचा संकल्प करावा. हा देश ७.५ च्या जीडीपीने प्रगती करत आहे. युवकांनी आता छोटी ध्येये नव्हे तर मोठी स्वप्ने पाहण्याचे गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
35.3 ° C
35.3 °
35.3 °
37 %
5.1kmh
64 %
Mon
42 °
Tue
42 °
Wed
42 °
Thu
42 °
Fri
38 °

Most Popular

Recent Comments