17.1 C
New Delhi
Tuesday, January 13, 2026
HomeTop Five News242 प्रवासी असणारे विमान झाले क्रॅश!

242 प्रवासी असणारे विमान झाले क्रॅश!

अहमदाबाद विमानतळावर एअर इंडियाचे बोईंग 787-8 ड्रीमलायनर कोसळले

Air India plane crash | देशासाठी आणि एअर इंडियासाठी आजचा दिवस धक्कादायक ठरला आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथून लंडनकडे रवाना होणारे एअर इंडियाचे AI 171 हे बोईंग 787-8 ड्रीमलायनर विमान झेप घेतानाच काही मिनिटांतच कोसळले. या भीषण दुर्घटनेत सुमारे २५० प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. प्राथमिक माहितीनुसार, विमानाचा संपर्क उड्डाणानंतर काही क्षणांतच तुटला आणि काही मिनिटांतच मेघानीनगर परिसरात मोठा अपघात झाला.

विमान कोसळल्यानंतर परिसरात प्रचंड धुराचे लोट पसरले आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले. अग्निशमन दलाच्या सात गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एनडीआरएफ आणि बीएसएफच्या तुकड्याही घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. पोलिस आयुक्तांनी घटनास्थळी भेट दिली असून, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गृहमंत्री अमित शहांशी तातडीने संपर्क साधला आहे.

AI 171 हे विमान बोईंग 787-8 ड्रीमलायनर प्रकारातील असून, ११ वर्षांपूर्वी एअर इंडियाच्या ताफ्यात समाविष्ट झाले होते. हे विमान लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी प्रसिद्ध आहे आणि जगभरातील अनेक विमान कंपन्यांकडे हे मॉडेल आहे. बोईंग 787-8 ड्रीमलायनरमध्ये नवीन जनरेशन इंजिन, 1,26,000 लिटर इंधन क्षमतेची टाकी, 56.7 मीटर लांबी, 60.1 मीटर पंखांची रुंदी आणि 913 किमी/तास वेग अशी वैशिष्ट्ये आहेत. हे विमान जुन्या 767 मॉडेलपेक्षा 20% अधिक इंधन कार्यक्षम असून, 50% कंपोझिट मटेरियलमुळे वजन कमी आणि इंधन बचत होते. एका विमानाची किंमत जवळपास 2,069 कोटी रुपये (248 दशलक्ष डॉलर्स) आहे.

या अपघातानंतर DGCA आणि बोईंग कंपनीच्या तज्ज्ञांनी तपास सुरू केला आहे. ब्लॅक बॉक्स आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डर मिळाल्यानंतरच अपघाताचे नेमके कारण समजू शकेल. सध्या संपूर्ण देशात या दुर्घटनेमुळे शोककळा पसरली आहे.

News Title: Air India Plane Crash in Ahmedabad: Boeing 787-8 Dreamliner Crashes with 242 Onboard – Features and Cost Revealed

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
17.1 ° C
17.1 °
17.1 °
45 %
3.1kmh
18 %
Tue
17 °
Wed
20 °
Thu
22 °
Fri
23 °
Sat
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!