32.6 C
New Delhi
Saturday, July 11, 2026
HomeTop Five Newsविमानवाहतुकीत करिअरसाठी सुवर्णसंधी; ५ एप्रिल रोजी पायलट ॲप्टिट्यूड टेस्ट व कमर्शियल पायलट...

विमानवाहतुकीत करिअरसाठी सुवर्णसंधी; ५ एप्रिल रोजी पायलट ॲप्टिट्यूड टेस्ट व कमर्शियल पायलट लायसन्स मेगा सेमिनार

पुणे : विमानवाहतुकीत करिअर करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली असून यंग लर्नर्स एव्हिएशन अकॅडमी आणि सरसंघचालक डॉ. बाळासाहेब देवरस एव्हिएशन गॅलरी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने “पायलट ॲप्टिट्यूड टेस्ट व कमर्शियल पायलट लायसन्स ” या विषयावर मेगा सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.

या सेमिनारची माहिती पुणे महानगरपालिका सरसंघचालक डॉ. बाळासाहेब देवरस एव्हिएशन गॅलरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी कॅप्टन नितीन बेंद्रे, यंग लर्नर्स एव्हिएशन अकॅडमीच्या संचालक रश्मी इंदुलकर, तसेच सरसंघचालक डॉ. बाळासाहेब देवरस एव्हिएशन गॅलरीचे व्यवस्थापक सुजित शेंडकर उपस्थित होते.

नितीन बेंद्रे म्हणाले, “सदर सेमिनार रविवार, ५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता शिवाजीनगर गावठाण येथील एव्हिएशन अँड स्पेस म्युझियम येथे आयोजित करण्यात आली आहे. या सेमिनारमध्ये विद्यार्थ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन, पायलट प्रशिक्षणाची माहिती, तसेच शिक्षण कर्जासंदर्भात सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे . भारतासह अमेरिका, फिलिपाईन्स, युरोप व दक्षिण आफ्रिका येथे प्रशिक्षणाच्या संधींबाबतही यावेळी माहिती देण्यात येणार आहे. एकंदरीत या क्षेत्रात विद्यार्थ्यांना आणि पालकांना वाटणाऱ्या सगळ्या शंकचे निरसन करण्यात येणार आहे. पायलट प्रशिक्षणाची संपूर्ण प्रक्रिया, तसेच एव्हिएशन क्षेत्रातील देश-विदेशातील करिअर संधी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.”

रश्मी इंदुलकर म्हणाल्या, ” आज या क्षेत्रात जागतिक आणि स्थानिक पातळीवरील नोकरीच्या संधींची माहिती मिळाल्याने विद्यार्थ्यांना करिअर नियोजन अधिक सोपे होणार आहे. यंग लर्नर्स एव्हिएशन अकॅडमीने आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना विमानवाहतुकीतील करिअरसाठी मार्गदर्शन केले आहे. या सेमिनारच्या माध्यमातून इच्छुक विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळून पायलट होण्याचे स्वप्न साकार करण्याची संधी उपलब्ध होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.”

सुजित शेंडकर म्हणाले, ” या क्षेत्रातील अधिक माहिती आजच्या युवकांना नाही म्हणून या क्षेत्राकडे वळण्याचा युवकांचा कल हा कमी असतो पुण्यासारख्या शहरात त्याचबरोबर मध्यवर्ती ठिकाणी एवढ्या प्रशस्त जागेत एव्हिएशन सेक्टरमधील ही म्युझियम उभी आहे याचे व्यवस्थापन आज माझ्या हातात आहे. गेल्या वर्षभरात आम्ही पाहिला आहे अनेक विद्यार्थी आवडीने येतात आणि या क्षेत्रातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक असतात यावरून एक गोष्ट लक्षात येते युवकांना या क्षेत्रात यायची इच्छा आहे मात्र योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही यासाठी आम्ही या म्युझियम मध्ये नामांकित क्षेत्रातील व्यक्तींना बोलवून सेमिनार घेण्याचे आयोजले आहे तर पुणेकरांना आवाहन आहे ते सेमिनारचा पुरेपूर लाभ घ्यावा”.

या सेमिनारविषयी अधिक माहितीसाठी +९१ ८४८४९९८०२२ या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा info@ylaa.in या ई-मेलवर संपर्क साधता येईल. तसेच www.ylaa.in⁠� या संकेतस्थळावरही आवश्यक माहिती उपलब्ध आहे. हे सेमिनार सर्वांसाठी मोफत असून केवळ येण्याआधी वरील नंबरवर किंवा
संकेतस्थळावरही रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
32.6 ° C
32.6 °
32.6 °
52 %
2.5kmh
99 %
Sat
41 °
Sun
42 °
Mon
42 °
Tue
42 °
Wed
40 °

Most Popular

Recent Comments