23.1 C
New Delhi
Tuesday, April 14, 2026
HomeTop Five Newsएसएनडीटी महिला विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद

एसएनडीटी महिला विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद

* शिक्षक सक्षमीकरण हे शैक्षणिक परिवर्तनाचे मुख्य आधार : राज्यपालांचे SNDT महिला विद्यापीठ पुणे  परिषदेत प्रतिपादन

* पुण्यात राष्ट्रीय परिषदेत NPST व मार्गदर्शन अभियानावर भर

* शिक्षक मानके व मार्गदर्शन प्रणालीवर SNDT मध्ये राष्ट्रीय स्तरावरील चर्चा

* शिक्षक क्षमतावृद्धी राष्ट्रीय परिषदेत केंद्रस्थानी



महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी आज सात राज्यांमधील शिक्षक व शिक्षण क्षेत्रातील भागधारकांच्या क्षमता वृद्धीसाठी आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिषदचे दृकश्राव्य माध्यमातून उद्घाटन केले. एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाने राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) यांच्या सहकार्याने या दोन दिवसीय परिषदेचे पुणे येथे आयोजन केले आहे. 



उदघाटन सत्राला एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या कुलगुरु प्रा. उज्वला चक्रदेव, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, एनसीटीईचे कार्यक्रम समन्वयक डी. के. चतुर्वेदी, उच्च शिक्षण संचालक शैलेन्द्र देवळाणकर, केंद्रीय विद्यालय संघटनेचे आयुक्त विकास गुप्ता, तसेच एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. विलास नांदवडेकर आदी उपस्थित होते.



यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान तसेच एनसीटीईचे अध्यक्ष प्रा. पंकज अरोरा यांचे व्हिडीओ संदेश दाखवण्यात आले.

SNDT महिला विद्यापीठ, पुणे येथे शिक्षक व शैक्षणिक घटकांच्या क्षमतावृद्धीवरील राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
:

“राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षक मानके (NPST) आणि राष्ट्रीय मेंटरिंग अभियान (NMM) यांच्या देशव्यापी अंमलबजावणीसाठी शैक्षणिक घटकांची क्षमतावृद्धी” या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद (२७–२८ मार्च २०२६) आज SNDT महिला विद्यापीठ, पुणे येथील JDBIMSR सभागृहात उद्घाटित झाली. ही परिषद राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) आणि SNDT महिला विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे.
या उद्घाटन समारंभास महाराष्ट्राचे राज्यपाल मा. श्री. जिष्णू देव वर्मा यांची आभासी उपस्थिती लाभली.
राज्यपालांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात शिक्षक सक्षमीकरण हे शैक्षणिक परिवर्तनाचे मुख्य आधार आहे असे प्रतिपादन करत NPST व NMM यांच्या माध्यमातून शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यावर भर दिला.


ग्रामीण व आदिवासी भागातील तसेच मुलींच्या उच्च शिक्षणातील सहभाग वाढवण्यासाठी School Connect सारख्या उपक्रमांत विद्यापीठांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले. तसेच Swayamsiddha सारख्या उपक्रमांद्वारे महिलांच्या सक्षमीकरणासाठी कौशल्यविकास व उद्योजकतेला चालना देण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
जागतिक स्तरावरील बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बहु-कौशल्याधारित, लवचिक आणि आत्मनिर्भर युवा पिढी घडविण्याची गरज अधोरेखित केली. तसेच राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी (NIRF) मध्ये प्रगती साधण्याचे आणि नवोपक्रमांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले.
राज्यपालांनी भारतरत्न महर्षी कर्वे यांनी स्थापन केलेल्या SNDT महिला विद्यापीठाच्या समृद्ध परंपरेचे कौतुक करून महिलांच्या शिक्षणातील योगदानाचा गौरव केला.
या प्रसंगी राष्ट्रीय नेतृत्वाचे संदेशही सादर करण्यात आले. केंद्रीय शिक्षणमंत्री मा. श्री. धर्मेंद्र प्रधान यांच्या संदेशात शिक्षक क्षमतावृद्धी व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीवर भर देण्यात आला.
मा. श्री. जयंत चौधरी, कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), यांच्या व्हिडिओ संदेशात शिक्षक शिक्षणात कौशल्यविकासाचा समावेश करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
श्री. विकास गुप्ता, आयुक्त, केंद्रीय विद्यालय संघटना (KVS) यांनी त्यांच्या संदेशात मार्गदर्शन प्रणाली व शिक्षकांच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासावर भर दिला.
प्रा. डॉ. शरद कुंटे, प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ, यांनी कोठारी आयोगाच्या शिफारशींमधील शैक्षणिक दृष्टीकोन आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० यामधील सातत्य अधोरेखित करत सर्वसमावेशक व भविष्याभिमुख शिक्षणाची गरज व्यक्त केली.
प्रा. उज्ज्वला चक्रदेव, कुलगुरू, SNDT महिला विद्यापीठ, यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात गुणवत्तापूर्ण शिक्षक शिक्षण व धोरणांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर दिला. त्यांनी विद्यापीठांनी नवोपक्रम, समावेशकता आणि उत्कृष्टतेची केंद्रे म्हणून कार्य करावे असे सांगितले.
तसेच त्यांनी तंत्रज्ञानाधारित अध्यापन, परिणामाधिष्ठित शिक्षण व आंतरशाखीय दृष्टिकोन स्वीकारण्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि शिक्षक हे राष्ट्रनिर्माते असल्याचे सांगत त्यांच्या सक्षमीकरणासाठी संस्थात्मक बळकटीकरणाची गरज व्यक्त केली.

प्रा. पंकज अरोरा, अध्यक्ष, NCTE यांनी प्रमुख व्याख्यानात NPST व NMM यांची संकल्पना स्पष्ट करत शिक्षकांच्या व्यावसायिक प्रगतीसाठी पारदर्शक व कौशल्याधारित चौकट विकसित करण्यावर भर दिला. तसेच अनुभवी तज्ज्ञांच्या माध्यमातून प्रभावी मार्गदर्शन व्यवस्था उभारण्याचे महत्त्व त्यांनी सांगितले.
त्यांनी सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास, चिंतनशील अध्यापन पद्धती आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर हे NEP 2020 च्या उद्दिष्टपूर्तीसाठी आवश्यक असल्याचे नमूद केले.
परिषदेचा आढावा श्री. डी. के. चतुर्वेदी, कार्यक्रम समन्वयक, NCTE यांनी सादर केला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रा. डॉ. विलास नांदवडेकर, कुलसचिव, SNDT महिला विद्यापीठ यांच्या स्वागतपर भाषणाने झाली.
या परिषदेत विविध राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील शिक्षण विभागाचे अधिकारी, SCERT, DIET प्रतिनिधी, प्राचार्य, शिक्षक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले आहेत.

शिक्षणशास्त्र विभागाचे प्राचार्य डॉ. सुभाष पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला.

ही दोन दिवसीय परिषद विविध तांत्रिक सत्रे, चर्चा व विचारमंथनाच्या माध्यमातून NPST व NMM च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी दिशा ठरविणार आहे.


RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
23.1 ° C
23.1 °
23.1 °
46 %
2.1kmh
0 %
Tue
38 °
Wed
39 °
Thu
40 °
Fri
41 °
Sat
41 °

Most Popular

Recent Comments