33.1 C
New Delhi
Wednesday, May 20, 2026
HomeTop Five Newsफ्युएल शिक्षण संस्था समूह तर्फेवार्षिक कॉन्क्लेव्ह व फ्युचर स्किल्स समिट ६ फेब्रुवारी...

फ्युएल शिक्षण संस्था समूह तर्फेवार्षिक कॉन्क्लेव्ह व फ्युचर स्किल्स समिट ६ फेब्रुवारी रोजी

पुणे, – : फ्युएल शिक्षण संस्था समूहातर्फे ‘वार्षिक कॉन्क्लेव्ह व फ्युचर स्किल्स समिट-२०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे.  शुक्रवार, दि ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ .०० वाजता या समिटचे उद्घाटन फ्युएल कॅम्पस, भूगाव, पुणे येथे करण्यात येईल. या कार्यक्रमाच्या  उद्घाटन प्रसंगी केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर हे मुख्य अतिथि म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे विशेष अतिथि म्हणून उपस्थित राहतील. अशी माहिती फ्युएल शिक्षण संस्था समूहाचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. केतन देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी फ्युएल च्या सीओओ मयुरी देशपांडे व  विभाग प्रमुख डाॅ. प्राची अहिरराव उपस्थित होते. 

राष्ट्रीय स्तरावरील हा एक उच्च प्रभावी मंच असून, धोरणकर्ते, शासनाचे वरिष्ठ अधिकारी, उद्योग व एचआर लिडर, सीएसआर प्रमुख, शिक्षणतज्ज्ञ आणि युवक प्रतिनिधि यांना एकत्र आणणारा हा महत्वपूर्ण उपक्रम आहे. या मध्ये केरळ चे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर हे ‘ मूल्याधिष्ठित नेतृत्व, सहकार्यात्मक प्रशासन आणि शिक्षण कौशल्य परिसंस्थेच्या बळकटीकरण’ या विषयावर विचार मांडतील. त्याचप्रमाणे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे ‘भविष्यासाठी सज्ज शिक्षण व्यवस्था, कौशल्य विकास आणि युवक सक्षमीकरणाबाबत राज्य सरकारची भूमिका’ अधोरेखित करणार आहेत.
कॉन्क्लेव्हमध्ये राऊंडटेबल चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये देशातील नामांकित एचआर व सीएसआर क्षेत्रातील वरिष्ठ व्यक्ती सहभागी होणार आहेत. या चर्चेमध्ये उद्योन्मुख भरती प्रवाह, कार्यबलाच्या अपेक्षा, नेतृत्व कौशल्ये, तसेच उद्योग शिक्षण संस्थांमधील समन्वय यावर सखोल संवाद होणार आहे. यामध्ये गीतांजली कथाळे चक्रवर्ती, श्रद्धा मेहता, नेहा मुखीजा, सतीश कोंजेटी, टीना आर, कृष्णा पांडा, गौरी मधुसूदनन,अश्विन कुमार, निधिन हल, प्रमोद पांडेय, अभिषेक रंजन, कल्याण जोडवे आणि खुर्रम नायाब सहभागी होणार आहेत.


त्याचप्रमाणे या मध्ये ‘फ्युचर स्किल्स’, ‘इंडस्ट्री ५.०’,‘मानवी केंद्रित शिक्षण’, ‘रोजगारक्षमता’, ‘नेतृत्व तयारी’ आणि ‘सीएसआर आधारित कौशल्य विकास’ या विषयांवर विशेष सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत.
कार्यक्रमात उद्घाटन सत्र, प्रमुख भाषणे, विषयक चर्चा तसेच उत्कृष्टतेचा सन्मान, शिक्षण, कौशल्य विकास, सीएसआर आणि युवक सक्षमीकरण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी पुरस्कार दिला जाणार आहे. तसेच या प्रसंगी भारताच्या सोशल स्टॉक एक्सचेंज चौकटी अंतर्गत फ्युएल चा एक महत्वपूर्ण टप्पा अधिकृतपणे जाहीर केला जाणार आहे. या माध्यमातून पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि सामाजिक प्रभावाचे मोजमाप अधिक सक्षम होईल. तसेच महिला, पहिल्या पिढीतील शिकणारे विद्यार्थी आणि वंचित युवकांसाठी शिक्षण व कौशल्य उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्याचा मार्ग मोकळा होईल.
” फ्युएल वार्षिक कॉन्क्लेव्ह व फ्युचर स्किल्स समिट २०२६ हे धोरण, उद्योग आणि शिक्षण क्षेत्राला एकत्र आणणारे व्यासपीठ आहे. सोशल स्टॉक एक्सचेंज अंतर्गतचा हा टप्पा पारदर्शकता, मोजता येणारे परिणाम आणि मोठ्या प्रमाणातील सामाजिक प्रभावासाठी आमची कटिबद्धता अधोरेखित करतो.” असे डॉ. देशपांडे यांनी नमूद केले.
फ्युएल वार्षिक कॉन्क्लेव्ह व फ्युचर स्किल्स समिट २०२६ हा उपक्रम शासन, उद्योग, शिक्षण संस्था आणि नागरी समाज यांच्यातील सहकार्य अधिक बळकट करुन कौशल्यसमृद्ध, समावेशक आणि भविष्यासाठी सज्ज भारत घडविण्याच्या सामायिक उद्दिष्टाला नवे बळ देईल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
33.1 ° C
33.1 °
33.1 °
24 %
2.1kmh
0 %
Wed
45 °
Thu
45 °
Fri
44 °
Sat
45 °
Sun
43 °

Most Popular

Recent Comments