14.1 C
New Delhi
Friday, November 21, 2025
HomeTop Five Newsआगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानासाठी नागरिकांमध्ये जनजागृती वाढवा आणि तक्रार निवारण यंत्रणा सक्षम...

आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानासाठी नागरिकांमध्ये जनजागृती वाढवा आणि तक्रार निवारण यंत्रणा सक्षम करा – आयुक्त हर्डीकर

आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या तयारीसह दैनंदिन कामकाजाचा घेतला सविस्तर आढावा....

पिंपरी, – : आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीनिमित्त शहरातील मतदान केंद्रांची स्थळनिश्चिती, निवडणूक कक्ष अधिकाऱ्यांची नेमणुकी, मतदान केंद्रांची सुविधा, अपंगजनांसाठी सोयी, मतदान कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, ईव्हीएमची सुरक्षितता, मतदार यादी अद्ययावत करणे, प्रभागांतील आवश्यक पायाभूत दुरुस्ती, प्रारूप मतदार यादीतील बदल आणि मतदानासाठी नागरिकांमध्ये जनजागृती वाढवण्याचे तसेच तक्रार निवारण यंत्रणा सक्षम करण्याचे निर्देश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सार्वत्रिक निवडणुकीसह महापालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजाचा सखोल आढावा घेतला.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, सहायक आयुक्त मनोज लोणकर, नगरसचिव मुकेश कोळप, मुख्य लेखा परीक्षक प्रमोद भोसले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, सहशहर अभियंता बापू गायकवाड, मनोज शेठीया, अनिल भालसाकळे, स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयराज यादव, उपायुक्त अण्णा बोदडे, राजेश आगळे, डॉ. प्रदीप ठेंगल, सचिन पवार, सिताराम बहुरे, संदीप खोत, ममता शिंदे, उपआरोग्य वैद्यकीय अधिकारी अभयचंद्र दादेवार, सहाय्यक आयुक्त अतुल पाटील, किरणकुमार मोरे, अजिंक्य येळे, क्षेत्रीय अधिकारी किशोर ननवरे, अमित पंडित, निवेदिता घार्गे, पूजा दूधनाळे, अश्विनी गायकवाड, मुख्य उद्यान अधिकारी महेश गारगोटे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीत प्रथम शहरातील दैनंदिन सेवा, स्वच्छता व्यवस्था, खड्डेमुक्ती मोहिम आणि मास्टर प्लॅन अंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांची माहिती आयुक्तांनी मागवली. अवैध होर्डिंग हटविण्याची मोहीम, रस्ते प्रकाशयोजना, जलपुरवठा व ड्रेनेज यंत्रणेची स्थिती याबाबतही सविस्तर चर्चा करत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

तसेच, आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या तयारीसंदर्भात प्रशासनाच्या सर्व शाखांकडून अहवाल सादर करण्यात आले. नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी नियंत्रण कक्ष अधिक सक्षम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सर्व विभागांनी समन्वय राखत प्रलंबित कामे वेगाने पूर्ण करावीत, असे निर्देश आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. महापालिकेच्या मूलभूत सुविधा आणि सेवांवर अधिक भर देऊन कार्यक्षमता वाढवण्याचे आदेशही आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले.

सर्व प्रभागांना विशेष मोहीम राबवून अवैध होर्डिंग तातडीने हटवण्याचे निर्देश देण्यात आले. सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या किंवा वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या बोर्डांवर तत्काळ कारवाई करावी, तसेच परवानाधारक होर्डिंगची माहिती अद्ययावत ठेवून महसूल विभागाशी समन्वय वाढवावा, अशा सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.   

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
14.1 ° C
14.1 °
14.1 °
88 %
0kmh
0 %
Fri
27 °
Sat
27 °
Sun
26 °
Mon
26 °
Tue
26 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!