39.4 C
New Delhi
Sunday, June 21, 2026
HomeTop Five Newsप्रभाग समिती अध्यक्ष निवडीचा बिगुल

प्रभाग समिती अध्यक्ष निवडीचा बिगुल

२१ एप्रिलला मतदान

Pune municipal News | पुणे : मिनी महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांतील प्रभाग समिती अध्यक्षांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. या निवडणुका येत्या २१ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता महापालिकेच्या नवीन विस्तारित इमारतीतील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडणार आहेत. यासाठी १७ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या नगरसचिव योगिता भोसले यांनी दिली. (pune corporation)

दरम्यान, महापालिकेने केलेल्या क्षेत्रीय कार्यालय आणि प्रभाग समिती पुनर्रचनेत त्रुटी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात समिती रचनेला स्थगिती देण्याची मागणी Sunetra Pawar यांनी मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. या मागणीची दखल घेत नगरविकास विभागाने ७ एप्रिल रोजी महापालिकेला तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे २१ एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

मात्र, महापालिकेने संबंधित अहवाल शासनाकडे सादर केला असून अद्याप कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी निवडणुका नियोजित वेळापत्रकानुसार घेण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. यामुळे निवडणूक प्रक्रियेला हिरवा कंदील मिळाला आहे.

महापालिकेच्या एकूण १५ प्रभाग समित्या असून, नव्या रचनेनुसार १४ समित्यांवर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष निवडून येण्याची शक्यता आहे. तर एका समितीवर काँग्रेसला संधी मिळण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे या निवडणुका महापालिकेतील सत्तासमीकरणांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत. politics

प्रभाग समिती अध्यक्षांची निवड होत असल्याने स्थानिक प्रशासनाला गती मिळणार असून, नागरिकांच्या प्रश्नांवर त्वरित निर्णय घेण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या निवडणुकांकडे राजकीय व प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
39.4 ° C
39.4 °
39.4 °
25 %
2.8kmh
0 %
Sun
41 °
Mon
41 °
Tue
42 °
Wed
42 °
Thu
42 °

Most Popular

Recent Comments