36.1 C
New Delhi
Wednesday, May 13, 2026
Homeमनोरंजन"देऊळ बंद २" च्या पोस्टरने जिंकली प्रेक्षकांची मने, चित्रपट खेचणार तुफान गर्दी

“देऊळ बंद २” च्या पोस्टरने जिंकली प्रेक्षकांची मने, चित्रपट खेचणार तुफान गर्दी

– प्रविण विठ्ठल तरडेंचे मास्टरमाईंड दिग्दर्शन आणि मोहन जोशींचे ‘स्वामी’ रूप; ‘देऊळ बंद २’ साठी प्रेक्षक उत्सुक.

बहुप्रतिक्षित “देऊळ बंद 2” च्या प्रदर्शनाची २१ मे २०२६ ही तारीख गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात आली व त्यामुळे स्वामीभक्त आणि प्रेक्षकांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण निर्माण झाले. आनंदाबरोबरच उत्सुकता वाढली असतानाच आज “देऊळ बंद 2” चे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले आणि आनंदात अजूनच भर पडली. “देऊळ बंद” मध्ये ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी आपल्या सशक्त अभिनयाने आणि आवाजाने स्वामी समर्थ अक्षरशः प्रत्यक्षात आपल्या समोर उभे राहून आपल्याशी संवाद साधत आहेत असे प्रेक्षकांना वाटत होते. तेच सर्वांना “देऊळ बंद 2” मध्ये अनुभवायला मिळणार आहे, कारण या भागात सुद्धा मोहन जोशी हेच श्री स्वामी समर्थांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत तर महत्त्वपूर्ण भूमिकेत अभिनेत्री स्नेहल तरडे त्यांच्या सोबत असणार आहेत.

वटवृक्ष एंटरटेनमेंट निर्मित “देऊळ बंद २ – आता परीक्षा देवाची” च्या पहिल्या पोस्टरमध्ये प्रसन्न मुद्रेने हात उंचावत स्वामी दुचाकीवर मागे बसले असून अभिनेत्री स्नेहल तरडे ती दुचाकी चालवत आहेत. स्वामी जरी प्रसन्न मुद्रेत असले तरी स्नेहल यांच्या चेहऱ्यावर राग आहे आणि डोळ्यातून अश्रू ओघळत आहेत, आता हा राग कशासाठी आणि दुःख कशाचे? यासाठी प्रेक्षकांना चित्रपटाची वाट पाहायला लागणार आहे. ‘भक्त कितीही संकटात असला तरी स्वामी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात’, हाच संदेश या पोस्टरमधून अधोरेखित होत आहे. पहिल्या भागात स्वामींनी परदेशातून आलेल्या शास्त्रज्ञाच्या आलिशान चारचाकीतून प्रवास केला होता तर “देऊळ बंद २” मध्ये स्वामी एका गरीब महिलेच्या सामान्य दुचाकीवरून प्रवास करताना दिसत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटात स्वामीकृपेने एका सामान्य कुटुंबाची असामान्य गोष्ट पाहायला मिळणार असे दिसत आहे.

२१ मे २०२६ रोजी प्रदर्शित होणाऱ्या वटवृक्ष एंटरटेनमेंट निर्मित “देऊळ बंद २” ची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन अष्टपैलू कलाकार प्रविण विठ्ठल तरडे यांचे असून निर्मिती कैलाश वाणी, जयश्री कैलाश वाणी, कैवल्य वाणी आणि जुईली वाणी – सूर्यवंशी यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
36.1 ° C
36.1 °
36.1 °
38 %
2.6kmh
20 %
Wed
37 °
Thu
45 °
Fri
45 °
Sat
44 °
Sun
46 °

Most Popular

Recent Comments