33.1 C
New Delhi
Tuesday, May 26, 2026
Homeमनोरंजनझी स्टुडिओजच्या ‘सुपर डुपर’चा टीझर प्रदर्शित!

झी स्टुडिओजच्या ‘सुपर डुपर’चा टीझर प्रदर्शित!

कौटुंबिक महासोहळा रंगणार ३ एप्रिलला

Marathi Cinema | मुंबई- आपल्याकडे कौटुंबिक गोष्टी आवडीने बघणारा  एक मोठा प्रेक्षकवर्ग आहे. कुटुंबातील सुख दुःखाच्या गोष्टीत रमणारा, कथेतील पात्रांसोबत हसणारा- रडणारा.. त्या पात्रांमध्ये स्वतःचा शोध घेणारा हा प्रेक्षकवर्ग नेहमीच कौटुंबिक विषयांना भरभरून दाद देतो. अशा सर्वच स्तरांतील, वयोगटातील आणि विविध भागांतील प्रेक्षकांना आवडेल, रुचेल आणि मनापासून भावेल अशीच गोष्ट असणारा ‘ सुपर डुपर ‘ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.  झी स्टुडिओजची प्रस्तुती, नाईंटी नाईन प्रॉडक्शन्स तथा सिद्धिविनायक प्रॉडक्शन्सची निर्मिती आणि समीर आशा पाटील यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘सुपर डुपर’ या चित्रपटाचा धमाकेदार टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.

या टिझरमधून चित्रपटातील एकाहून एक सरस कलाकारांची झलक बघायला मिळाली आहे. निर्मिती सावंत, शशांक शेंडे, हृषिकेश जोशी, नम्रता संभेराव, कुशल बद्रिके, प्रतीक्षा कोते आणि मुख्य नायक नायिकेच्या भूमिकेत असलेले ललित प्रभाकर आणि विदुला चौगुले अशी भलीमोठी स्टारकास्ट यामध्ये झळकणार आहे. कौटुंबिक महासोहळा अशी टॅगलाईन असलेला हा चित्रपट येत्या ३ एप्रिलला प्रदर्शित होणार असून टीझरमुळे प्रेक्षकांची उत्सकुता वाढली आहे. 

दिग्दर्शक समीर आशा पाटील म्हणतात, “आपण एका कुटुंबाची फिल्म घेऊन येत आहोत कुटुंबासाठी. माणसाच्या जडणघडणीमध्ये नेहमीच एका कुटुंबाचा हात असतो. कुटुंबामुळे अनेक भावना आपल्याला जगता येतात, अनुभवता येतात. अशाच अनेक भावनांची मेजवानी या चित्रपटात असणार आहे. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांना आपलासा वाटेल असा हा चित्रपट आहे..”

झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणतात की , ” या वर्षाच्या सुरुवातीलाच झी स्टुडिओजने ‘ अगं अगं सुनबाई ! काय म्हणताय सासूबाई ? या चित्रपटामधून एका कुटुंबातील सुखदुःखाची गोष्ट सांगितली जी प्रेक्षकांना भावली. आता सुपर डुपर चित्रपटांमधून एका कुटुंबाचीच पण अतिशय वेगळ्या धाटणीची आणि धमाकेदार गोष्ट आम्ही घेऊन येत आहोत. मराठीतील अनेक मातब्बर कलाकारांच्या अभिनयाने सजलेला आणि नात्यांची गोष्ट सांगणारा हा चित्रपट प्रेक्षकांना आवडेल अशी खात्री आहे.”

या चित्रपटाचे विजय शिंदे आणि नरेश बोर्डे निर्माते आहेत. तर उमेश कुमार बन्सल, बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ता आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
33.1 ° C
33.1 °
33.1 °
31 %
3.6kmh
0 %
Tue
44 °
Wed
46 °
Thu
47 °
Fri
44 °
Sat
40 °

Most Popular

Recent Comments