36.6 C
New Delhi
Monday, July 13, 2026
Homeमाहिती तंत्रज्ञानसोमैया विद्याविहार विद्यापीठाने विविध शाखांतील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रियेस केला...

सोमैया विद्याविहार विद्यापीठाने विविध शाखांतील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रियेस केला प्रारंभ

पुणे – : सोमैया विद्याविहार विद्यापीठाने (एसव्हीयू) शैक्षणिक वर्ष २०२६ साठी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचा प्रारंभ झाल्याची घोषणा केली आहे. विद्यापीठाने कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखांतील विद्यार्थ्यांकडून प्रवेशासाठी अर्ज मागविले आहेत. ‘सोमैया विद्याविहार विद्यापीठ प्रवेश परीक्षा’(एसव्हीयूईटी) ही दिनांक ६ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

एसव्हीयूईटी ही विविध पदवीपूर्व अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठीची एक महत्त्वाची अशी प्रवेश परीक्षा आहे. ही परीक्षा ‘इंटरनेट-प्रॉक्टर्ड’(इंटरनेट-आधारित देखरेखीखाली) या पद्धतीने घेतली जाते. त्यामुळे उमेदवारांना घरातूनच परीक्षा देणे सुलभ होते. तसेच या प्रवेश परीक्षेद्वारे विद्यार्थी त्यांच्या शैक्षणिक आवडीनिवडी आणि करिअरविषयक आकांक्षांनुसार वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम, संगणक क्षेत्र, डेटा सायन्स, मानव्यशास्त्र व समाजशास्त्र, लिबरल आर्ट्स, डिझाइन, कला सादरीकरण (परफॉर्मिंग आर्ट्स) तसेच इतर विविध क्षेत्रांतील अभ्यासक्रमांसाठी अर्ज करू शकतात.

एसव्हीयूचा शैक्षणिक दृष्टिकोन लवचिकता आणि उद्योगसुसंगतता लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांसाठी वीसहून अधिक बहुविद्याशाखीय मायनर्स उपलब्ध असून, त्यामुळे त्यांना त्यांच्या मूळ विषयाबरोबरच विविध क्षेत्रांचाही अभ्यास करता येतो. थेट प्रकल्प, इंटर्नशिप तसेच समुदायाधारित उपक्रमांद्वारे दिल्या जाणाऱ्या अनुभवाधारित शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबरच व्यावहारिक अनुभवही प्राप्त होतो.

विद्यापीठ विद्यार्थ्यांना जागतिक अनुभवाच्या संधीही उपलब्ध करून देते. यामध्ये अमेरिका, युनायटेड किंग्डम, युरोप तसेच इतर प्रदेशांतील भागीदार विद्यापीठांसोबत आयोजित परदेशी सत्र कार्यक्रमांचा समावेश आहे. हे कार्यक्रम अनेकदा अतिरिक्त शिक्षण शुल्काशिवाय राबवले जातात.या आंतरराष्ट्रीय एकात्मतेमुळे विद्यार्थ्यांना जागतिक दृष्टिकोनासह आंतर-सांस्कृतिक क्षमता विकसित करण्याची संधी मिळते.

करिअरविषयक निष्पत्तींवर दिला जाणारा ठाम भर एसव्हीयूच्या प्लेसमेंट कामगिरीत स्पष्टपणे दिसून येतो. विद्यापीठाने २५० हून अधिक भरती करणाऱ्या संस्थांशी संपर्क प्रस्थापित केल्याचे नमूद केले असून, त्यामधून १,५०० हून अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये वार्षिक ₹५८ लाखांचे सर्वोच्च वेतन पॅकेज तसेच वार्षिक ₹११.३५ लाखांचे सरासरी वेतन समाविष्ट आहे. याशिवाय, विद्यार्थ्यांना २०० हून अधिक कॉर्पोरेट आणि संशोधन इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध होत असून, त्यामुळे त्यांच्या रोजगारक्षमतेत अधिक वाढ होत आहे.

कॅम्पसची परिसंस्था ८५ हून अधिक प्रयोगशाळा आणि विविध उत्कृष्टता केंद्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला अधिक चालना देते. तसेच, येथे क्लब, क्रीडा सुविधा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असलेले चैतन्यमय विद्यार्थी जीवन उपलब्ध आहे. पात्र विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी गुणवत्तेवर आधारित शिष्यवृत्ती, शिक्षण-शुल्क सवलत तसेच आर्थिक सहाय्य योजना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

एसव्हीयूईटी गुणांच्या आधारे सर्व शाखांतील विद्यार्थ्यांना बीबीए, बीबीएम, बीकॉम, बीसीए, बीएस्सी. (डेटा सायन्स, आयटी), बीए लिबरल आर्ट्स, बीएस्सी. अर्थशास्त्र, बीएस्सी. मानसशास्त्र, बीडिझाईन तसेच संगीत आणि प्रयोगकला विषयांतील लोकप्रिय पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठी अर्ज करता येतो. बहुविद्याशाखीय अभ्यासक्रम, उद्योगसुसंगत पाठ्यक्रम तसेच अनुभवाधारित आणि जागतिक शिक्षणावर दिल्या जाणाऱ्या भरामुळे ‘सोमैया विद्याविहार विद्यापीठ’ हे भविष्यासाठी सक्षम शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पसंतीचे केंद्र म्हणून आपले स्थान सातत्याने अधिक दृढ करत आहे.

अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया आता सुरू झाली असून, एसव्हीयूईटी स्लॉट निश्चित करण्यासाठी उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
36.6 ° C
36.6 °
36.6 °
34 %
4.3kmh
68 %
Sun
37 °
Mon
42 °
Tue
42 °
Wed
42 °
Thu
42 °

Most Popular

Recent Comments