35.1 C
New Delhi
Tuesday, May 26, 2026
Homeमहाराष्ट्रहमाल पंचायत पुणे निवडणुकीत गोरख मेंगडे अध्यक्ष

हमाल पंचायत पुणे निवडणुकीत गोरख मेंगडे अध्यक्ष

अंकुश अवताडे सरचिटणीसपदी विजयी

पुणे : हमाल पंचायत पुणेच्या त्रैवार्षिक निवडणुकीत गोरख मेंगडे यांची अध्यक्षपदी, तर अंकुश पंढरीनाथ अवताडे यांची सरचिटणीसपदी भरघोस मतांनी निवड झाली आहे. मार्केट यार्ड येथील हमाल भवनमध्ये पार पडलेल्या या निवडणुकीत डॉ. बाबा आढाव यांच्या विचारांनी प्रेरित पॅनलने प्रतिस्पर्धी पॅनलवर एकतर्फी विजय मिळवत संपूर्ण संघटनेवर आपला ठसा उमटवला.

या निवडणुकीत नवनिर्वाचित पॅनलने दणदणीत कामगिरी करत विरोधी गटाचा पूर्णतः पराभव केला. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर गोरख मेंगडे यांनी सांगितले की, सभासदांनी डॉ. बाबा आढाव यांच्या कार्यावर दाखवलेला विश्वास आणि वंचित घटकांसाठी केलेल्या कामाची दखल घेत या पॅनलला भरघोस समर्थन दिले.

सरचिटणीसपदी निवडून आलेले अंकुश अवताडे यांनीही हा विजय स्वतःचा नसून विचारांचा विजय असल्याचे नमूद केले. “माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला सुमारे २०० मते मिळाली, तर मला १४०० मते मिळाली. हा घवघवीत विजय सभासदांच्या विश्वासाचा आहे. डॉ. बाबा आढाव यांनी केलेल्या कार्यामुळेच हा पाठिंबा मिळाला,” असे त्यांनी सांगितले. पुढे संघटनेच्या बळकटीसाठी राज्यभर काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

उपाध्यक्षपदी सोपान धायगुडे यांची निवड झाली असून त्यांनीही संघटनेच्या प्रत्येक सभासदाच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले. “संघटनेतील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे ते म्हणाले.

या निवडणुकीत एकूण १२ उमेदवार विजयी झाले असून त्यामध्ये गोरख मेंगडे (अध्यक्ष), अंकुश अवताडे (सरचिटणीस), सोपान धायगुडे (उपाध्यक्ष) यांच्यासह मुरलीधर गर्जे, दत्तात्रय डोंबाळे, संदीप धायगुडे, संदीप मारणे, चंद्रकांत मानकर (खजिनदार), मंगेश फुंदे (सहसरचिटणीस), विनोद शिंदे, अरुण डोलारे आणि वत्सला गवळी यांचा समावेश आहे.

या निकालानंतर नानापेठ आणि पुणे परिसरात नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन होत असून, संघटनेत नव्या नेतृत्वाकडून अधिक कार्यक्षमतेची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
35.1 ° C
35.1 °
35.1 °
31 %
2.1kmh
20 %
Mon
37 °
Tue
44 °
Wed
46 °
Thu
47 °
Fri
44 °

Most Popular

Recent Comments