33.1 C
New Delhi
Sunday, May 31, 2026
Homeमाहिती तंत्रज्ञानअॅक्सिस मॅक्स लाइफने टियर २ आणि ३ बाजारपेठांमध्ये ‘भरोसे का अॅड्रेस’

अॅक्सिस मॅक्स लाइफने टियर २ आणि ३ बाजारपेठांमध्ये ‘भरोसे का अॅड्रेस’

 ५० नवीन कार्यालयांचे उद्घाटन

पुणे,-: अॅक्सिस मॅक्स लाइफ इन्शुरन्स लिमिटेडने जी पूर्वाश्रमीची मॅक्स लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आहे तिने विशेषतः उत्तर प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि आसाम अशा विविध ठिकाणी टियर २ आणि टियर ३ बाजारपेठांमध्ये ५० नवीन एजन्सी कार्यालये उघडून आपल्या वितरण जाळ्याचा विस्तार करण्याची घोषणा केली आहे.

हा उपक्रम आयआरडीएआयच्या ‘२०४७ पर्यंत सर्वांसाठी विमा’ मोहिमेसाठी प्रोत्साहक असून त्यामुळे जीवनविमा फक्त गुंतवणुकीची गोष्ट न ठरता मुख्य गरज असल्याचे स्पष्ट होते. भारताच्या उदयोन्मुख आर्थिक रचनांमध्ये आपल्या एजन्सी नेटवर्कचा विस्तार करताना अॅक्सिस मॅक्स लाइफचे उद्दिष्ट संरक्षणातील अंतर कमी करणे आणि आर्थिक समावेशकतेला चालना देणे तसेच अगदी दुर्गम भागांपर्यंत पोहोचण्याचे आहे.

अॅक्सिस मॅक्स लाइफचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुमित मदन म्हणाले, “आर्थिक संरक्षण भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचावे यासाठी आमची बांधिलकी आहे. आमच्या ५० कार्यालयांची भर पडल्याने उदयोन्मुख भारताच्या संरक्षणविषयक गरजांना थेट प्रतिसाद देण्यासाठी टियर २ आणि टियर ३ बाजारपेठांवर आमचे लक्ष केंद्रित झाल्याचे दिसून येते.

विमा संरक्षणाच्या पलीकडे जाऊन ‘भरोसे का अॅड्रेस’ कार्यालये स्थानिक समुदायांसाठी रोजगाराच्या महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध करून देतील. प्रत्येक शाखेला संरचित भरती आणि सक्षमीकरण कार्यक्रमाद्वारे पाठबळ दिले जाईल, नवीन सल्लागारांना डिजिटल साधने आणि संबंधित आर्थिक सल्ला देण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण दिले जाईल. हा स्थानिक दृष्टीकोन या गोष्टीची खात्री करतो की आर्थिक सल्ल्यात स्थानिक परंपरांचे प्रतिबिंब पडेल आणि देशभरातील कुटुंबांच्या आर्थिक प्रवासात अखंडपणे सहभागी होईल.

हे उद्घाटन हा वित्तीय वर्ष २६ चा महत्त्वाचा टप्पा असला तरी, ‘भरोसे का अॅड्रेस’ भारताच्या संरक्षण परिसंस्थेसाठी दीर्घकालीन वचनबद्धतेचे प्रतिनिधित्व करतो. हा विस्तार सातत्यपूर्ण, उच्च दर्जाचे संरक्षण उपाय वितरीत करण्यास सक्षम असलेल्या भविष्यासाठी सज्ज एजन्सी नेटवर्कला आधार देण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा म्हणून काम करेल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
scattered clouds
33.1 ° C
33.1 °
33.1 °
43 %
3.6kmh
40 %
Sun
34 °
Mon
38 °
Tue
41 °
Wed
43 °
Thu
42 °

Most Popular

Recent Comments