38.1 C
New Delhi
Tuesday, May 26, 2026
Homeमाहिती तंत्रज्ञानसिग्नेचर ग्लोबल आणि टोनिनो लॅम्बोर्गिनी यांच्याकडून गुरुग्राममध्ये नवीन लक्झरी ब्रांडेड निवासी प्रकल्पाची...

सिग्नेचर ग्लोबल आणि टोनिनो लॅम्बोर्गिनी यांच्याकडून गुरुग्राममध्ये नवीन लक्झरी ब्रांडेड निवासी प्रकल्पाची घोषणा

मुंबई  – : भारतातील आघाडीच्या रिअल इस्टेट डेव्हलपर्सपैकी एक असलेल्या सिग्नेचर ग्लोबलने सेक्टर ७१, गुरुग्राम येथे प्रीमियम निवासी प्रकल्पाच्या विकासासाठी इटालीतील प्रसिद्ध लाइफस्टाइल ब्रँड टोनिनो लॅम्बोर्गिनी यांच्याशी रणनीतिक सहकार्याची घोषणा केली आहे.

प्रसिद्ध कारागिरी, डिझाईनची उत्कृष्टता आणि लक्झरी जीवनशैलीसाठी जगभरात ओळखल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित अशा टोनिनो लॅम्बोर्गिनी ब्रँडच्या अंतर्गत इटालियन निवासी अनुभव या एक्सक्लूझिव्ह विकासातून सादर होणार आहे. या भागीदारीतून टोनिनो लॅम्बोर्गिनीचा भारतातील निवासी रिअल इस्टेट बाजारपेठेत लक्षणीय प्रवेश होत असून ब्रँडेड निवासी घरांच्या क्षेत्रात एक नवीन मापदंड निर्माण होणार आहे.  

हा प्रकल्प सुमारे १२.४० एकरांवर पसरला असून या विकासप्रकल्पात ३, ४ व ४.५ बीएचके प्रकारांमधील ८१२  प्रीमियम निवासस्थाने आकर्षण ठरणार आहेत. धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या अशा सेक्टर ७१, सदर्न पेरिफेरल रोड येथे त्याचे स्थान आहे – हे स्थान गुरुग्रामधील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या रिअल इस्टेट कॉरिडॉरपैकी एक आहे.  

सॅव्हिल्स इंडियाच्या मते, ब्रँडेड रेसिडेन्सेस सेगमेंटला जागतिक पातळीवर सातत्याने मोठी गती मिळत आहे. या सेगमेंटमधील योजनांची एकूण संख्या डिसेंबर २०२४  मधील ७६४ वरून २०२५ च्या अखेरीस ९१० पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे, ही वार्षिक १९ टक्क्यांची  भरीव वाढ आहे. नाईट फ्रँकच्या ‘द वेल्थ रिपोर्ट’नुसार, भारताला जागतिक पातळीवर पहिल्या १० देशांमध्ये स्थान असून तो आपले स्थान झपाट्याने मजबूत करत आहे – सध्या तो जागतिक पातळीवर सहाव्या क्रमांकावर असून जागतिक पुरवठ्यात त्याचे सुमारे ४ टक्के योगदान आहे. या पार्श्वभूमीवर, वाढती समृद्धी, विकसित होत असलेली लक्झरी इकोसिस्टम आणि जागतिक दर्जाच्या, आदरातिथ्य आधारित जीवनशैलीच्या वाढत्या मागणीमुळे गुरुग्राम हे देशातील ब्रँडेड निवासस्थानांच्या विकासामध्ये स्पष्टपणे आघाडीवर आहे. 

या भागीदारीद्वारे टोनिनो लॅम्बोर्गिनीची प्रतिष्ठित इटालियन कारागिरी, डिझाइनमधील उत्कृष्टता आणि ब्रँडची प्रतिष्ठा भारतीय शहरी जीवनात अग्रस्थानी येत आहे. हा प्रकल्प लॅम्बोर्गिनीच्या वारशात रुजलेला असून इटालियन अभिजातता आणि भारतीय महत्त्वाकांक्षा यांचा हा एक सुरेख संगम आहे. डिझाईनची जागतिक रूची आणि गुरुग्रामचा गतिमान विकास यांचा हा संगम आहे.

टोनिनो लॅम्बोर्गिनी टोटल लिव्हिंग क्रिएटिव्हच्या संचालिका श्रीमती अँजेला क्रिगर यांच्या सृजनशील दिग्दर्शनाखाली टोनिनो लॅम्बोर्गिनीचा डिझाईन हस्तक्षेप प्रमुख जीवनशैली आणि वास्तुशास्त्रीय घटकांपर्यंत विस्तारलेला असेल. यामध्ये एक भव्य स्वागत कक्ष आणि एक पूर्णपणे सुसज्ज क्लबहाऊस यांचा समावेश आहे. यात कॅफे, रेस्टॉरंट, मेजवानीसाठी जागा, योग, स्विमिंग-पूल आणि जिम सुविधा, स्पा आणि सौना, सलून आणि गेमिंग आर्केड यांसारखी आकर्षणे असतील. यातून एक संपूर्ण लक्झरी वातावरण निर्माण होईल. यामध्ये वेलनेसकडे एक परिष्कृत जीवनशैली तत्त्वज्ञान म्हणून पाहण्यात येईल. इथे जागा, वातावरण आणि ब्रँडचे वैशिष्ट्यपूर्ण डिझाईन दैनंदिन जीवनाचा दर्जा उंचावण्यासाठी एकत्र येतात. स्वास्थ्यासाठी संवेदनात्मक दृष्टिकोनामुळे या अनुभवाची निश्चिती होईल,पुनरुज्जीवन आणि शाश्वत आरामासाठी तयार केलेल्या विशेष वातावरणाद्वारे ऊर्जा आणि आंतरिक संतुलनाला त्यामुळे चालना मिळेल.

ब्रँडची वैशिष्ट्यपूर्ण डिझाइन शैली दर्शनी भागातही प्रतिबिंबित होणार आहे, त्यामुळे या प्रकल्पाला एक विशिष्ट आणि प्रतिष्ठित दृश्यात्मक ओळख लाभेल. 

वास्तुशास्त्रीय संकल्पनेमध्ये आरामदायकपणासाठी निवडक वृत्तीवर भर देण्यात आला आहे. प्रशस्तपणा आणि नैसर्गिक प्रकाशाला प्राधान्य देणाऱ्या डिझाईनचे तत्त्वज्ञान हे त्याचे वैशिष्ट्य आहे. मजल्यांच्या प्रशस्त उंचीमुळे खुलेपणाची भावना निर्माण होते आणि सभोवतालच्या हिरवळीचा जास्तीत जास्त आनंद घेता येईल अशा प्रकारे टॉवर्सची रचना करण्यात आली आहे. या विकास प्रकल्पामध्ये दैनंदिन जीवनाच्या अनुभवात निसर्गाला सहजपणे एकरूप करणाऱ्या बायोफिलिक-डिझाईन केलेल्या लँडस्केप्सचा समावेश आहे.

या सहकार्याविषयी भाष्य करताना सिग्नेचर ग्लोबल (इंडिया) लिमिटेडचे संस्थापक आणि अध्यक्ष श्री. प्रदीप अग्रवाल म्हणाले, “जागतिक दर्जाची नावीन्यता आपल्या मायभूमीत आणून भारतातील शहरी जीवनाचे मापदंड नव्याने निश्चित करणे, हे आमचे नेहमीच ध्येय राहिले आहे. टोनिनो लॅम्बोर्गिनीसारख्या जागतिक मानचिन्हासोबत भागीदारी करून आम्ही केवळ अपार्टमेंट्स बांधत नाही आहोत, तर आम्ही आधुनिक भारतीय कर्तृत्ववान व्यक्तीच्या महत्त्वाकांक्षांशी जुळणारी जीवनशैली निर्माण करत आहोत. सेक्टर ७१ मधील हा प्रकल्प उत्कृष्टतेप्रति असलेल्या आमच्या कटिबद्धतेचा पुरावा आहे. सिग्नेचर ग्लोबलचे एकात्मिक समुदायाच्या उभारणीतील कौशल्य आणि केवळ टोनिनो लॅम्बोर्गिनीच देऊ शकणारी कालातीत इटालियन कारागिरी यांचा हा संगम आहे.”

सिग्नेचर क्लबहाऊस हे या प्रकल्पाच्या केंद्रस्थानी असून ते टोनिनो लॅम्बोर्गिनीच्या वैशिष्ट्यपूर्ण डिझाईन तत्त्वज्ञानातून साकारलेल्या जागतिक दर्जाच्या सुविधा प्रदान करते. यामध्ये रहिवाशांना एका भव्य स्वागत कक्षापासून सुरू होणाऱ्या आणि डिझायनर कॅफे, फाइन-डायनिंग रेस्टॉरंट, भव्य बँक्वेट आणि हाय-एंड गेमिंग आर्केडपर्यंत विस्तारणाऱ्या निवडक अनुभवांच्या मालिकेत रममाण होण्याचा अनुभव मिळेल. यातील आरोग्य सुविधादेखील तितक्याच व्यापक असून त्यात अत्याधुनिक जिम, स्विमिंग-पूल आणि योगासाठी जागा, एक लक्झरी स्पा आणि सौना आणि एक प्रीमियम सलून यांचा समावेश आहे. या सर्व सुविधा आगमनाच्या क्षणापासूनच एक उन्नत जीवनशैलीचा अनुभव देण्यासाठी विचारपूर्वक तयार केल्या आहेत. 

एकात्मिक समुदाय विकसित करण्यामधील सिग्नेचर ग्लोबलचे कौशल्य आणि सूक्ष्म नियोजन व नाविन्याप्रती असलेली त्यांची कटिबद्धता या सहकार्यातून अधोरेखित झाली आहे. सिग्नेचर ग्लोबल आणि टोनिनो लॅम्बोर्गिनी एकत्रितपणे एका महत्त्वपूर्ण प्रकल्पाला आकार देत असून परिष्कृत, समकालीन जीवनशैली आणि इटालियन उत्कृष्टतेच्या चिरस्थायी आकर्षणाचा पुरावा म्हणून तो उभा आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
38.1 ° C
38.1 °
38.1 °
22 %
4.6kmh
40 %
Mon
40 °
Tue
45 °
Wed
46 °
Thu
47 °
Fri
45 °

Most Popular

Recent Comments