32.1 C
New Delhi
Friday, May 8, 2026
Homeमाहिती तंत्रज्ञानकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अधिरा अँड अप्पा कॉफीच्या फ्लॅगशिप कॅफेचे...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अधिरा अँड अप्पा कॉफीच्या फ्लॅगशिप कॅफेचे उद्घाटन

२०२६ पर्यंत भारतभर १०० कॅफे उभारण्याचे लक्ष्य; प्रत्येक कपात शाश्वतता आणि परंपरेचा संगम

नागपूर, – : मोबिलिटी, हेल्थ, रिअल्टी, लाइफस्टाइल, फूड, सर्व्हिसेस, टेक्नॉलॉजी आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या वेगाने वाढणाऱ्या भारतीय समूह ईबीजी ग्रुपने आपल्या फ्लॅगशिप प्रकल्प अधिरा अँड अप्पा कॅफेचा नागपूरमध्ये विस्तार जाहीर केला आहे. पूनम चेंबर्स, चिंडवाडा रोड, छावणी रोड, बायरामजी टाउन येथे नवीन कॅफेचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी गुरुक्कल डॉ. एस. महेश हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आणि त्यांनी आपल्या आशीर्वादाने कार्यक्रमाची शोभा वाढवली.

सुमारे ९०० चौ.फुटांमध्ये उभारलेला हा कॅफे चांगले अन्न, उत्कृष्ट कॉफी आणि मनमोकळ्या संवादांवर केंद्रित आहे. नागपूर आउटलेटमध्ये पाश्चिमात्य चवींना दक्षिण भारतीय स्वादांची सांगड घालणारा खास फ्युजन मेन्यू देण्यात आला आहे. यामध्ये डोसा टॅकोस, मेदू वडा वॅफल्स यांसारख्या नाविन्यपूर्ण पदार्थांचा समावेश आहे. अधिरा अँड अप्पा कॅफेमध्ये दिली जाणारी सर्व कॉफी ही अस्सल दक्षिण भारतीय फिल्टर कॉफीवर आधारित असून, परंपरा आणि दर्जाबाबत ब्रँडची कटिबद्धता अधोरेखित करते. या उद्घाटनासोबतच पुढील काही महिन्यांत इंदूर, पुणे, बेंगळुरू तसेच इतर प्रमुख शहरांमध्ये विस्तार करण्याचा ईबीजी ग्रुपचा मानस आहे.

उद्घाटनप्रसंगी केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी म्हणाले, “अधिरा अँड अप्पा कॅफे हे परंपरा आणि नवकल्पनांचा विचारपूर्वक मिलाफ दर्शवते. अस्सल दक्षिण भारतीय फिल्टर कॉफीसारख्या स्वदेशी चवींना प्रोत्साहन देत, लोकांसाठी आपुलकीची सामुदायिक ठिकाणे निर्माण करणारे उपक्रम स्थानिक उद्योजकता आणि सांस्कृतिक ओळख बळकट करण्यासाठी महत्त्वाचे आहेत. भारतभर विस्तारासाठी मी संपूर्ण टीमला शुभेच्छा देतो.”

विस्ताराबाबत बोलताना ईबीजी ग्रुपचे चेअरमन आणि संस्थापक डॉ. इरफान खान म्हणाले,
“नागपूरमधील हा शुभारंभ अधिरा अँड अप्पा कॅफेच्या राष्ट्रीय विस्तारातील महत्त्वाचा टप्पा आहे. शाश्वतता आणि अस्सलतेच्या तत्त्वांवर आधारित या ब्रँडने कोचीपासून सुरुवात करून चंदीगड, नाशिक, हैदराबाद आणि आता नागपूरपर्यंत यशस्वी वाटचाल केली आहे. प्रीमियम कॉफी बीनचा वापर आणि पारंपरिक पद्धतींपेक्षा कमी कार्बन उत्सर्जन करणाऱ्या प्रक्रियांमुळे हा ब्रँड जागतिक साखळी कॅफेंना एक अस्सल भारतीय पर्याय देतो.”

यावेळी अधिरा अँड अप्पा कॅफेचे सीओओ श्री. करण मेंडन म्हणाले, “अधिरा अँड अप्पा कॅफेमध्ये प्रत्येक कप परंपरा, शाश्वतता आणि नातेसंबंधांची गोष्ट सांगतो. हैदराबादमधील उत्तम प्रतिसादानंतर नागपूरमधील उत्साही समुदाय आमच्या परंपरा, नवकल्पना आणि अस्सल अनुभवांच्या अनोख्या मिश्रणाला नक्कीच स्वीकारेल, असा आम्हाला विश्वास आहे. ईबीजी ग्रुपच्या पाठबळावर, भारतभर अस्सल दक्षिण भारतीय फिल्टर कॉफीचा अनुभव लोकांपर्यंत पोहोचवणे आणि संस्कृती, चव व समुदाय एकत्र येतील अशी ठिकाणे निर्माण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”

मजबूत सुरुवातीच्या प्रतिसादाच्या जोरावर, ईबीजी ग्रुप मार्च २०२६ पर्यंत ५० हून अधिक नवीन अधिरा अँड अप्पा कॉफी कॅफे सुरू करण्याची योजना आखत असून, डिसेंबर २०२६ पर्यंत १०० आउटलेट्स उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे. पुढील पाच वर्षांत प्रमुख महानगरे आणि टियर-२ शहरांमध्ये देशव्यापी उपस्थिती निर्माण करण्याचा समूहाचा मानस आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
32.1 ° C
32.1 °
32.1 °
37 %
5.1kmh
0 %
Fri
31 °
Sat
40 °
Sun
42 °
Mon
43 °
Tue
44 °

Most Popular

Recent Comments