20.6 C
New Delhi
Friday, November 7, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञानसोनालिका ट्रॅक्टरची सप्टेंबर २५ मध्ये २०,७८६ ट्रॅक्टरची मासिक उच्चांकी विक्री

सोनालिका ट्रॅक्टरची सप्टेंबर २५ मध्ये २०,७८६ ट्रॅक्टरची मासिक उच्चांकी विक्री

पुणे – : भारतातील नंबर १ ट्रॅक्टर निर्यात ब्रँड, सोनालिका ट्रॅक्टर्स, आपल्या हेवी-ड्युटी, तंत्रज्ञान-चालित ट्रॅक्टरसह पुन्हा एकदा देशभरातील शेतकऱ्यांसाठी उत्सवाचा आनंद घेऊन आला आहे. कंपनीने सप्टेंबर २०२५ मध्ये २०,७८६ ट्रॅक्टरची आतापर्यंतची सर्वाधिक मासिक विक्री केली आहे. देशांतर्गत मजबूत मागणी आणि भारतीय शेतकऱ्यांसाठी कार्यक्षमता, उत्पादकता व नफा वाढवणारे कस्टमाईज्ड उत्पादने पुरविण्याची सोनालिकाची दृढ कटिबद्धता यामुळे ही उल्लेखनीय कामगिरी झाली आहे.

सणासुदीचा हंगाम ऐन भरात आलेला असताना, सोनालिकाने आपली सर्वात मोठी वार्षिक ऑफर ‘हेवी ड्यूटी धमाका’ ही ऑगस्ट २०२५ पासून आधीच वाढविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सर्वात फायद्याच्या किंमतीत सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा वापर करण्याची हमी मिळते. केंद्र सरकारने नुकतेच ट्रॅक्टरवरील जीएसटीमधील १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत जाहीर केलेल्या कपातीमुळे शेतकऱ्यांचा विश्वास आणखी दृढ झाला आहे आणि देशभरात अवजड ट्रॅक्टर अधिक परवडणारे आणि सुलभ झाले आहे. जगातील नंबर १ एकीकृत ट्रॅक्टर उत्पादन कारखान्याचा आधार असलेली सोनालिका देशभरात उत्कृष्ट प्रतीचे ट्रॅक्टर आणि वेळेवर वितरणाची हमी देत आहे. बाजारपेठेतील लवचिक दृष्टिकोन, समर्थ पुरवठा साखळी आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यावर लक्ष केंद्रित करून सोनालिका भारतीय शेतांमध्ये विकास, समृद्धी आणि उत्सवाच्या आनंदांना नवीन उंचीवर नेत आहे.

इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेडचे सहव्यवस्थापकीय संचालक रमण मित्तल म्हणाले, पावसाळा लांबल्यामुळे आणि केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या जीएसटी कपातीमुळे शेतकऱ्यांच्या भावना उंचावण्यास आणि नवीन युगातील तंत्रज्ञान असलेल्या ट्रॅक्टरचा अवलंब करून स्वत: ला उन्नत करण्यात महत्त्वपूर्ण चालना मिळाली आहे. प्रत्येक कापणीमधून त्यांची प्रगती सुनिश्चित करण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहू.”

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
20.6 ° C
20.6 °
20.6 °
14 %
2.8kmh
0 %
Fri
29 °
Sat
29 °
Sun
29 °
Mon
29 °
Tue
29 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!