35.3 C
New Delhi
Monday, July 13, 2026
Homeमहाराष्ट्रमहापौर रवी लांडगे यांचा “माझा फार्मासिस्ट, माझा अभिमान” या गौरवचिन्हाने सन्मान…

महापौर रवी लांडगे यांचा “माझा फार्मासिस्ट, माझा अभिमान” या गौरवचिन्हाने सन्मान…

फार्मासिस्ट सहकारी महापौर झाल्याने पिंपरी चिंचवडमधील केमिस्ट बंधू-भगिनींमध्ये आनंदाचे वातावरण….

पिंपरी, :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून केमिस्ट व्यावसायिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी, नियमावली सुलभ करण्यासाठी आणि आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्याचा माझा प्रयत्न राहील. शहराच्या सर्वांगीण विकासात आरोग्य क्षेत्राला प्राधान्य देत, प्रशासन आणि व्यावसायिक यांच्यात समन्वय वाढविण्यावर भर देण्यात येईल. पिंपरी चिंचवड केमिस्ट असोसिएशनतर्फे ‘माझा फार्मासिस्ट, माझा अभिमान’ या गौरवचिन्हाने केलेला सन्मान माझ्यासाठी अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी आहे. मी स्वतः फार्मासिस्ट असल्यामुळे आरोग्यसेवेच्या क्षेत्रातील जबाबदाऱ्या आणि आव्हाने जवळून अनुभवलेली आहेत. समाजाच्या आरोग्य सुरक्षेत केमिस्ट बंधू-भगिनींची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. हा सन्मान माझा नसून संपूर्ण केमिस्ट समुदायाचा आहे. आपण दाखवलेला विश्वास आणि प्रेम हेच माझ्या कार्याची खरी प्रेरणा आहे. अशी भावना महापौर रवि लांडगे यांनी व्यक्त केली.

नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत महापौरपदी निवड झाल्याबद्दल नवनिर्वाचित महापौर रवि लांडगे यांचा पिंपरी चिंचवड केमिस्ट असोसिएशनतर्फे सन्मान करण्यात आला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महानगरपालिकेतील प्रशासकीय भवनातील महापौर कक्षात केमिस्ट असोसिएशनतर्फे महापौर रवि लांडगे यांचा “माझा फार्मासिस्ट, माझा अभिमान” या गौरवचिन्हाने सन्मान करण्यात आला.यावेळी आपल्या भावना व्यक्त करतांना महापौर रवि लांडगे बोलत होते.

या प्रसंगी पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष विवेक तापकीर, पीआरओ सचिन धोका, पिंपरी चिंचवड केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष रवी पवार, सचिव चेतन शिंगवी, खजिनदार नंदू पानसरे, भोसरी केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष वसुदेव चव्हाण, संघटक राजेश टोपे, किरण थोरवे, अंकुश परांडे, उमेश देसाई, टाव्हरे, महिला संघटकमोहिनी कोळी, पवन टिंगरे, विशाल टेकाळे, विनोद टोपे तसेच मोठ्या संख्येने केमिस्ट बंधू-भगिनी उपस्थित होते.

फार्मासिस्ट म्हणून कार्यरत असलेल्या महापौर लांडगे यांच्या निवडीमुळे पिंपरी चिंचवडमधील औषध विक्रेते व केमिस्ट बंधू-भगिनींमध्ये आनंदाचे वातावरण असून, हा क्षण केमिस्ट क्षेत्रासाठी अभिमानास्पद असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
35.3 ° C
35.3 °
35.3 °
37 %
5.1kmh
64 %
Mon
42 °
Tue
42 °
Wed
42 °
Thu
42 °
Fri
38 °

Most Popular

Recent Comments