33.7 C
New Delhi
Monday, July 13, 2026
Homeमहाराष्ट्रविद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच अधिकाधिक ज्ञान आत्मसात करावे!

विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच अधिकाधिक ज्ञान आत्मसात करावे!

पुणे  – भारतीय भाषा, विज्ञान, तंत्रज्ञान,आरोग्य, क्रीडा याबरोबरच भारतीय ज्ञान परंपरा यांचा अभ्यास विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच आत्मसात केला पाहिजे. त्यातूनच आपली वैभवशाली संस्कृती व परंपरा जपली जाईल, असा मोलाचा सल्ला पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी विद्यार्थ्यांना दिला.

पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील प्रियदर्शनी पुणे पोलीस पब्लिक स्कूलतर्फे आयोजित रूटस् अँड विंगज या वार्षिक शैक्षणिक प्रदर्शनाचे उद्घाटन अमितेश कुमार यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त डॉ. सागर कवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलीस कल्याण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर, प्रियदर्शनी व्यवस्थापनाच्या संस्थापक सचिव तरूणा सिंह, प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूलचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. राजेंद्र सिंह, पूजा सिंह, डॉ. जितेंद्र सिंह, शाळेच्या प्राचार्या अर्पिता दीक्षित यांच्यासह पोलीस विभागातील अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मराठी भाषेच्या उगमपासूनचा प्रवास, भारतीय शिक्षण पद्धती आणि इंग्रजांकडून दिले जाणारे शिक्षण, शिक्षणासाठी स्थापन करण्यात आलेले वेगवेगळे आयोग, शिक्षणात मातृभाषेला देण्यात आलेले प्राधान्य अशा प्रदर्शनातील विविध प्रकल्पांना भेट देवून अमितेश कुमार यांनी विद्यार्थ्यांशी संवादही साधला. हिंदी, इंग्रजी यासह विज्ञान, तंत्रज्ञान, रोबोटिक्स, स्पोर्ट आदी विषयांवरील प्रकल्पांची त्यांनी पाहणी केली. प्रदर्शनातून दिसणारी विद्यार्थ्यांमधील बुद्धीमत्ता, सर्जनशीलता आणि कलात्मकता यांचा सुरेख संगम पाहून त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

प्रयोगातून शिक्षण कसे घ्यावे, अशी प्रकल्पाची मांडणी केल्याबद्दल डॉ. राजेंद्र सिंह यांनी विद्यार्थ्यांचे व प्रदर्शनासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शाळेच्या सर्व पालकांनी प्रदर्शन पाहण्याचा आनंदही लुटला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
33.7 ° C
33.7 °
33.7 °
43 %
4.7kmh
100 %
Mon
42 °
Tue
42 °
Wed
42 °
Thu
41 °
Fri
39 °

Most Popular

Recent Comments