23.7 C
New Delhi
Thursday, October 9, 2025
Homeमहाराष्ट्रमालमत्ता करावरील ४ टक्के सवलतीचा लाभ घेण्याची शेवटची संधी!

मालमत्ता करावरील ४ टक्के सवलतीचा लाभ घेण्याची शेवटची संधी!

पिंपरी,- : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने मालमत्ता धारकांसाठी ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत मालमत्ता कराचा संपूर्ण भरणा ऑनलाइन स्वरूपात केल्यास सामान्य करावर ४ टक्के सवलत देण्यात येत आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी एक दिवस शिल्लक आहे. अद्यापही ज्या मालमत्ताधारकांनी चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ चा मालमत्ता कर भरला नाही, त्यांनी तो ३० सप्टेंबर २०२५ पूर्वी भरून सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेकडून करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेने आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कर संकलन व कर आकारणी विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांच्या अधिपत्याखाली आर्थिक वर्ष २०२५-२६ चा मालमत्ता कर वसूल करण्यासाठी १ एप्रिल २०२५ पासून व्यापक मोहीम हाती घेतली आहे. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत मालमत्ता कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांना सामान्य करावर ४ टक्के सवलत देण्यात येत आहे. नागरिकांना कर सवलतीची माहिती देण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने थेट संपर्क साधला जात आहे. कर संकलन विभागाच्या १८ विभागीय कार्यालयांमार्फत लिपिक, गटलिपिक, सहायक मंडलाधिकारी आणि इतर एकूण २० कर्मचाऱ्यांची टीम टेलिकॉलिंगच्या माध्यमातून थेट नागरिकांशी संवाद साधत आहे. या संवादातून नागरिकांना मालमत्ता कर सवलतीची माहिती दिली जात असून, वेळेत कर भरण्याचे आवाहन केले जात आहे. त्यातच आता सामान्य करावर देण्यात आलेली ४ टक्के सवलतची मुदत संपण्यासाठी अवघा एक दिवस बाकी आहे. तरी नागरिकांनी आपला चालू आर्थिक वर्षातील तसेच थकीत कर भरून या सवलतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
……..

मालमत्ता कर ३० सप्टेंबर २०२५ पूर्वी भरणाऱ्यांना सामान्य करावर देण्यात आलेल्या ४ टक्के सवलतीचा लाभ जास्तीत जास्त मालमत्ताधारकांना मिळावा, यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. नागरिक देखील या योजनेला चांगला प्रतिसाद देत आहे. अद्यापही या सवलतीचा लाभ घेण्यासाठी एक दिवसांची मुदत बाकी असून जास्तीत जास्त मालमत्ताधारकांनी या सवलतींचा लाभ घेऊन भविष्यात होणारी कारवाई टाळावी.
प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
……
कोट

कर आकारणी व कर संकलन विभागाने कर संकलनासाठी नागरिकांशी थेट संवाद वाढवला आहे. टेलिकॉलिंग, मेसेज, नोटिसा आणि जनजागृती मोहिमेतून नागरिकांना वेळेत कर भरण्याचे आवाहन केले जात आहे. मालमत्ता कर हा फक्त महसूल नसून शहराच्या विकासातील तुमचा थेट सहभाग आहे. रस्ते, उद्याने, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा या सर्वांसाठी कराचा वापर केला जातो. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने कर भरण्यात पुढाकार घ्यावा.
अविनाश शिंदे, सहायक आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
23.7 ° C
23.7 °
23.7 °
37 %
3.4kmh
0 %
Thu
30 °
Fri
31 °
Sat
33 °
Sun
33 °
Mon
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!