35.4 C
New Delhi
Tuesday, June 23, 2026
Homeमाहिती तंत्रज्ञानकॅपिटालँडने पुण्यातील होप स्कूल प्रोग्राम केला अधिक मजबूत

कॅपिटालँडने पुण्यातील होप स्कूल प्रोग्राम केला अधिक मजबूत

१,४०० हून अधिक विद्यार्थ्‍यांना दर्जेदार शिक्षण उपलब्‍ध करून दिले

पुण्यातील फेज २ च्‍या पूर्ततेसह होप स्कूल प्रोग्रामने भारतातील ३,००० हून अधिक मुलांच्‍या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला आहे

पुणे, – कॅपिटालँड होप फाउंडेशनने (सीएचएफ) या कॅपिटालँड ग्रुपच्‍या परोपकारी शाखेने आज पुण्यातील आपल्या होप स्कूल प्रोग्रामच्या फेज २ च्‍या पूर्ततेची घोषणा केली. या विस्तारामुळे आता एकूण १,४०० हून अधिक विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. कॅपिटालँड इन्व्हेस्टमेंट इंडियाचे अध्यक्ष श्री. किशोर मोरजानी, भोरवाडी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. नंदकुमार लक्ष्मण भोर आणि कॅपिटालँडच्या कर्मचारी स्वयंसेवकांच्या उपस्थितीत फेज २ चे अधिकृत उद्घाटन करण्यात आले. या टप्प्याच्‍या पूर्ततेमधून कॅपिटालँड कार्यरत असलेल्‍या समुदायांमधील गरजू मुलांच्या शिक्षणासाठी आणि कल्याणासाठी असलेली सीएचएफची कटिबद्धता दिसून येते.

या नवीन टप्प्यांतर्गत हिंजवडीतील भोरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत जवळपास १२,००० चौरस फूट क्षेत्रफळात १९ नवीन वर्गखोल्या बांधण्यात आल्या आहेत. २०२३ मध्ये पूर्ण झालेल्या पहिल्या टप्प्यानंतर ही पुढील प्रगती आहे. पहिल्या टप्प्यात शाळेचे नूतनीकरण करून नवीन वर्गखोल्या आणि स्वच्छतागृहे बांधण्यात आली होती, तसेच वाचनालय, संगणक आणि विज्ञान प्रयोगशाळांसारखी नवीन संसाधने उपलब्ध करून दिली होती, ज्यासाठी स्थानिक प्रशासनाचे मोठे सहकार्य लाभले होते.

या विस्तारामुळे शाळेची क्षमता वाढली आहे, ज्‍यामुळे, आता पूर्वीपेक्षा दुप्पट म्हणजेच ७६० अतिरिक्त विद्यार्थ्यांना प्रवेश देणे शक्य झाले आहे. सुसज्ज वर्गखोल्या, अद्ययावत शैक्षणिक साधने आणि सुधारित पायाभूत सुविधांमुळे ही शाळा विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरक्षित आणि अनुकूल वातावरण प्रदान करते.

कॅपिटालँड होप फाउंडेशन (इंडिया) चे संचालक आणि कॅपिटालँड इंडिया ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गौरी शंकर नागभूषणम म्हणाले, “महाराष्ट्रभरातील बिझनेस पार्क्स, डेटा सेंटर्स, लॉजिस्टिक्स आणि इंडस्ट्रियल पार्क्समध्ये कॅपिटालँडची उपस्थिती मोठी आहे, तसेच सातत्याने वाढत आहे. पुण्यातील आमच्या व्यवसायांच्या अगदी जवळ असलेल्‍या या शाळेमधून आम्ही कार्यरत असलेल्‍या स्‍थानिक समुदायासांठी महत्त्वपूर्ण कार्य करण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. केवळ पायाभूत सुविधाच नव्हे, तर कॅपिटालँडचे कर्मचारी स्वयंसेवक आणि सामाजिक भागीदारांच्या पाठिंब्यामुळे विद्यार्थ्यांसाठी अधिक समृद्ध शैक्षणिक वातावरण तयार होत आहे.”

कॅपिटालँड होप स्कूल प्रोग्रामच्या माध्यमातून सीएचएफ मुलांना सर्वसमावेशक आणि सहाय्यक शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देते, ज्यामुळे शैक्षणिक निकाल सुधारतात आणि मुलांच्या दीर्घकालीन सामाजिक प्रगतीचा व सक्षमतेचा पाया रचला जातो. भारतात हा उपक्रम सध्या बेंगळुरू, हैदराबाद, चेन्‍नई आणि पुणे येथील विविध शाळांमधील ३,००० हून अधिक विद्यार्थ्यांना पाठिंबा देत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
scattered clouds
35.4 ° C
35.4 °
35.4 °
25 %
3.3kmh
48 %
Mon
35 °
Tue
42 °
Wed
39 °
Thu
42 °
Fri
43 °

Most Popular

Recent Comments