36.6 C
New Delhi
Monday, July 13, 2026
Homeमहाराष्ट्र'भारतीय संविधान आणि लोकशाही’ संदर्भ ग्रंथाचा कराड येथे गौरव

‘भारतीय संविधान आणि लोकशाही’ संदर्भ ग्रंथाचा कराड येथे गौरव

पुणे प्रतिनिधी-

भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वाटचालीचा अभ्यासपूर्ण आढावा घेणाऱ्या “भारतीय संविधान आणि लोकशाही : अमृतमहोत्सवी वाटचाल – एक दृष्टिक्षेप” या संदर्भ ग्रंथाचा कराड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला. प्रा. डॉ. जयसिंह व सुनिता सुभाष ओहोळ लिखित या ग्रंथाचे कौतुक मा. आमदार बाळासाहेब पाटील (मा. सहकार व पणन मंत्री, महाराष्ट्र राज्य, तसेच पालकमंत्री सातारा व अध्यक्ष – श्री शिवाजी शिक्षण संस्था, कराड) आणि प्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. राजन गवस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने लोकशाही मूल्यांचे जतन व संवर्धन करण्याची गरज अधोरेखित केली. समाजात संविधानाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच तरुण पिढीपर्यंत संविधानातील मूलभूत तत्त्वे पोहोचवण्यासाठी अशा प्रकारचे अभ्यासपूर्ण संदर्भ ग्रंथ अत्यंत महत्त्वाचे ठरतात, असे मतही मान्यवरांनी व्यक्त केले.
या ग्रंथामध्ये भारतीय संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, स्वातंत्र्यानंतरची लोकशाही वाटचाल, सामाजिक समता, न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांचा आढावा घेण्यात आला असून संविधानाच्या अमृतमहोत्सवी कालखंडाचे विश्लेषणही करण्यात आले आहे. त्यामुळे हा ग्रंथ अभ्यासक, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
यावेळी विचारपीठावर वेणुताई चव्हाण कॉलेज, कराडचे प्राचार्य प्रा. डॉ. आर. आर. जाधव, जिमखाना अध्यक्ष प्रो. डॉ. एस. आर. सरोदे, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे जनरल सेक्रेटरी ए. एन. मुल्ला, संस्थेचे विश्वस्त अरुण (काका) पाटील, अॅड. मानसिंगराव पाटील, संस्थेचे सदस्य दिलीपराव चव्हाण, प्रकाश (बापू) पाटील तसेच माजी प्राचार्य बी. एन. कालेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात लेखकांचे अभिनंदन करण्यात आले. संविधानाचा विचार समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी साहित्यिक आणि शैक्षणिक उपक्रमांची गरज असल्याचेही उपस्थितांनी यावेळी नमूद केले

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
36.6 ° C
36.6 °
36.6 °
34 %
4.3kmh
68 %
Sun
37 °
Mon
42 °
Tue
42 °
Wed
42 °
Thu
42 °

Most Popular

Recent Comments