38.9 C
New Delhi
Saturday, June 7, 2025
Homeमहाराष्ट्रपिंपरी-चिंचवडसह पुण्यातील मान्यवरांना ‘छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार’

पिंपरी-चिंचवडसह पुण्यातील मान्यवरांना ‘छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार’

पिंपरी- नवी मुंबईतील ‘छावा प्रतिष्ठान’ यांच्या वतीने २१ मे रोजी मुंबई येथे भव्य दिव्य सोहळ्यात ‘छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार २०२४-२५’ प्रदान करण्यात येणार आहे. महाराष्ट्रभरातून विविध क्षेत्रातील मान्यवरांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील मान्यवरांचा या यादीत समावेश असून, त्यांच्या कार्याची राज्यपातळीवर दखल घेतली गेली आहे.

क्रीडा, समाजसेवा व शेती क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान

पिंपरी-चिंचवडमधून सुनील साठे, राजेंद्र कांबळे, विष्णुपंत पाटील, सुधा खोले, सुप्रिया यादव यांची क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी निवड झाली आहे. पुणे शहरातील अजय कांबळे यांनाही क्रीडा क्षेत्रातल्या कार्यासाठी गौरविण्यात येणार आहे.

सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान दिल्याबद्दल काळूराम लांडगे, डॉ. व नगरसेवक विश्वास गजरमल यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार दिला जाणार आहे. तसेच शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सुभाष माकर यांचाही या पुरस्कारासाठी सन्मान होणार आहे.

सिने अभिनेते आणि अभिनेत्रींच्या हस्ते पुरस्कार वितरण

हा पुरस्कार सोहळा प्रसिद्ध सिने अभिनेते संभाजी माने आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री कुमुदिनी अदाटे यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे. कार्यक्रमाला अनेक नगरसेवक, आमदार आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या पुरस्कार सोहळ्याद्वारे छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण करून देत, महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्याचा स्तुत्य उपक्रम छावा प्रतिष्ठानने हाती घेतला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
38.9 ° C
38.9 °
38.9 °
23 %
2kmh
0 %
Sat
39 °
Sun
46 °
Mon
46 °
Tue
45 °
Wed
45 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!