36.6 C
New Delhi
Monday, July 13, 2026
Homeताज्या बातम्याप्राचीन इतिहासाच्या दस्तऐवजांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची गरज - महापौर मंजुषा नागपुरे

प्राचीन इतिहासाच्या दस्तऐवजांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची गरज – महापौर मंजुषा नागपुरे

पुणे, – आपल्या देशाच्या जाज्वल्यपूर्ण अशा प्राचीन इतिहासाच्या दस्तऐवज, साहित्यांचे, स्मारकांचे संरक्षण आणि संवर्धन होण्याची मोठी गरज आहे, ज्यासाठी भांडारकरसारख्या संस्था वर्षानुवर्षे चिकाटीने काम करीत आहेत, अशा कार्याला सरकारबरोबरच समाजाच्या दातृत्वाची देखील गरज असल्याचे प्रतिपादन पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी आज येथे केले. यावेळी त्यांच्या हस्ते महाभारत-सांस्कृतिक सूची या संशोधन प्रकल्पातील “भीम” या पुस्तकाचे प्रकाशन देखील करण्यात आले. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेच्या संग्रहातील महत्त्वाची हस्तलिखिते, ग्रंथ आणि मौल्यवान वस्तूंचा तसेच संशोधनप्रकल्पांचा समावेश असलेल्या “ज्ञानसागर” प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी खेलरत्न पुरस्कार विजेत्या ऑलिंपिकपटू नेमबाज अंजली भागवत, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. स्मिता लेले, संस्थेचे अध्यक्ष अभय फिरोदिया, कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन, मानद सचिव प्रा. सुधीर वैशंपायन, विश्‍वस्त प्रदीप रावत व्यासपीठावर उपस्थित होते. भांडारकर संस्थेत सोमावरपर्यंत (23 फेब्रुवारी) हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे.

पुढे बोलतांना महापौर नागपुरे म्हणाल्या की, जुन्या गोष्टींचे महत्व लक्षात घेवून या क्षेत्रात अधिकाधिक संशोधन व्हायला हवे. संशोधक तयार होण्यासाठी अशा प्रकारच्या प्रदर्शनांची गरज आहे, ज्यातून या क्षेत्राकडे तरुणांना येण्याचे प्रोत्साहन मिळेल. भांडारकर संस्थेच्या पुढील कार्यासाठी पुणे महानगरपालिका सर्वतोपरी सहाय्य करेल व राज्य व केंद्र सरकारकडे देखील पाठपुरावा करु.

भांडारकर संस्थेच्या कार्याचा गौरव करतांना अंजली भागवत म्हणाल्या की, जगातील सर्वात मोठे भांडार असलेली तिजोरी म्हणजे भांडारकर संस्था आहे. या संस्थेकडे असलेला प्राचीन साठा बहुमूल्य आहे, त्याचे सर्व समाजाला दर्शन व्हावे यासाठीचा हा ज्ञानसागर प्रदर्शनाचा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे.
यावेळी फिरोदिया म्हणाले की, संशोधनाच्या क्षेत्रात गेली 108 वर्षे कार्यरत असणार्‍या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेच्या कार्यात तरुणांचा सहभाग वाढला पाहिजे. भारताचा अलौकिक असा प्राचीन इतिहास सर्वांनी अभ्यासला पाहिजे, यासाठीच भांडारकर संस्था चिकाटीने कार्य करीत आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने भांडारकर संस्थेचे कार्य सर्वसामान्यांना समजू शकेल.संस्थेच्या नियामक परिषदेचे सदस्य व या प्रदर्शनाचे समन्वयक मनोज एरंडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर संतोष रासकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे निबंधक श्रीनन्द बापट यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
36.6 ° C
36.6 °
36.6 °
34 %
4.3kmh
68 %
Sun
37 °
Mon
42 °
Tue
42 °
Wed
42 °
Thu
42 °

Most Popular

Recent Comments