32.5 C
New Delhi
Thursday, July 23, 2026
HomeTop Five Newsपुणे जिल्ह्यात सहकार क्षेत्रात हालचाल

पुणे जिल्ह्यात सहकार क्षेत्रात हालचाल

Election News – पुणे : राज्यातील सहकारी संस्थांच्या रखडलेल्या निवडणुकांना पुन्हा गती मिळाली असून, मंगळवारी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणने निवडणुका सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयानुसार पुणे जिल्ह्यातील एकूण १,१५४ सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये पुणे शहरातील ३४३ आणि पुणे ग्रामीण भागातील ८११ सहकारी संस्थांचा समावेश आहे, अशी माहिती प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे यांनी दिली.पुणे जिल्ह्यातील ‘अ’ वर्ग सहकारी संस्थांच्या प्रलंबित यादीत पाच संस्थांचा समावेश आहे. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य केडरायझेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी (सदाशिव पेठ, पुणे) तसेच महाराष्ट्र राज्य महिला संस्थांचा महासंघ मर्यादित (महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित, पुणे) या संस्थांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.दरम्यान, दौंड तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत २० मे २०२० रोजीच संपलेली आहे. मात्र निवडणुकीसाठी आवश्यक असलेला निवडणूक निधी अद्याप भरला न गेल्याने ही निवडणूक प्रलंबित असल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले.याचबरोबर बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत १३ ऑक्टोबर २०२६ रोजी, तर इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत १२ ऑक्टोबर २०२६ रोजी संपणार आहे. सध्या निवडणूक कार्यक्रम सुरू असला तरी पावसाळ्यानंतर सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याने या दोन साखर कारखान्यांच्या निवडणुका याच वर्षातील दुसऱ्या टप्प्यात होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

पुणे शहर आणि ग्रामीण भागातील आकडेवारी


पुणे शहरातील ३४३ सहकारी संस्थांमध्येअ वर्ग : २ब वर्ग : २०क वर्ग : २०८ड वर्ग : ११३तर पुणे ग्रामीण भागातील ८११ प्रलंबित संस्थांमध्येअ वर्ग : १ब वर्ग : ३९क वर्ग : ४८९ड वर्ग : २८२जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा धुरळा आता खाली बसत असतानाच, सहकारी संस्थांच्या निवडणुकांमुळे पुन्हा एकदा गावगाड्यात राजकीय हालचालींना वेग येणार आहे. साखर कारखाने, विविध विकास सोसायट्या आणि सहकार क्षेत्रातील निवडणुकांची रंगत येत्या काळात पाहायला मिळणार असल्याचे चित्र आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
light rain
32.5 ° C
32.5 °
32.5 °
54 %
5.1kmh
12 %
Thu
35 °
Fri
36 °
Sat
34 °
Sun
39 °
Mon
38 °

Most Popular

Recent Comments