36.2 C
New Delhi
Thursday, June 18, 2026
Homeमहाराष्ट्रमुस्लिम महिलांनी विविध क्षेत्रात नावलौकीक मिळवावा - प्रा. जस्मिन सय्यद

मुस्लिम महिलांनी विविध क्षेत्रात नावलौकीक मिळवावा – प्रा. जस्मिन सय्यद


कार्यक्रमाची सुरुवात युद्धात आणि आतंकवादी हल्यात निरपराध नागलिकांचा लोकांची हत्या केली त्या सर्व मृत्यूमुखी पडलेल्या सर्वांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात केली.

कोथरूड, –

शिक्षणाचा, काम करण्याचा, आयुष्याचा जोडीदार निवडण्याचा अधीकार मुस्लिम महिलांना १४०० वर्षांपूर्वी मिळाला. पण त्या अधिकाराचा वापर होताना दिसत नाही. प्रगतीसाठी त्यांना कोणी अडवले आहे? ही बंधने कोठून आली की आपण स्वतः ती घालून घेतली याचा विचार करण्याची गरज आहे. संरक्षण, हवाई विज्ञान, साहित्य क्षेत्र, क्रीडा, संगित, कला या क्षेत्रात त्यांनी आपले नाव मोठे करावे. असे मत प्रा. जस्मिन सय्यद यांनी व्यक्त केले.

गुरुवारी सायंकाळी गांधी भवन, कोथरूड येथे रोजा इफ्तार कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन अॅड. अभय छाजेड, प्रशांत जगताप उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर करीमुद्दीन शेख, जस्मिन सय्यद, लक्ष्मीकांत देशमुख व्यासपीठावर उपस्थित होते.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, युवक क्रांती दल, जमाते इस्लामी हिंद कॅम्प, पुणे, हाजी मक्केशा मस्जिद, डेक्कन, जकीउल्ला जामा मस्जिद, कोथरूड, मुस्लिम समाज सुधारण चळवळ यांनी या उपक्रमाचे संयोजन केले. या कार्यक्रमास पुणे शहरातील विविध जातीधर्माच्या स्री पुरुषांनी सहभाग घेत बंधुभावाचे दर्शन घडवले.

इफ्तार कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना प्रा. जस्मिन सय्यद म्हणाल्या की, महिलांसाठी आपल्या देशात शिक्षण मोफत आहे. परंतु शिक्षण घेवूनही मुस्लिम महिलांना घरातच राहावे लागत आहे. शिक्षणाचा उपयोग करायला त्यांना संधी मिळत नाही. काही महिला नोकरी करतात परंतु शिक्षण आणि नर्सिंग क्षेत्रात त्या काम करताना दिसतात. शिक्षणासाठी आयुष्याची १६ वर्षे घालविल्यानंतर त्यांचे स्वप्न चुल आणि मुल यातच खुंटते.

प्रा. जस्मिन सय्यद म्हणाल्या की, हुशारी असूनही महिला उद्योजकतेकडे वळत नाही. आपल्या छंदाला व्यवसायाकडे वळवण्याचा प्रयत्न करा. बचतीतून, आपल्या ऐपती प्रमाणे लघु उद्योग सुरु करावेत. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले आहे त्याचा उपयोग करावा. कोणतीही सुधारणा करायची असेल तर त्याला संघर्ष करावा लागतो. विवाहीत पत्नी हवी परंतु तीने घरातच रहावे या मानसिकतेतून समाजाने बाहेर पडण्याची गरज आहे.

शेख करिमुद्दीन म्हणाले की, जो मुसलमान इस्लाम समजतो तो कधीच आतंकवादी होवू शकत नाही. रमजान महिन्यात जे उपवास केले जाते त्यामुळे भुक आणि तहान याचे महत्व समजते. गरीब कोणत्या परिस्थितीत जीवन कंठतो हे समजते. रमजान शिकवते की, रागाला पिकवून टाका, समाज कार्यासाठी दान करा, न्याय, भाईचारा वाढवा.

रमजानच्या शुभेच्छा देताना ॲड.अभय छाजेड म्हणाले की, हा देश वेगवेगळ्या भाषा, विचारधारांचा आहे. आपल्यातील एकात्मता ही त्यातील बंधुभावामुळे आली आहे.
प्रशांत जगताप म्हणाले की, हा देश सर्वांचा आहे. मुस्लिम समाजाबद्दल गैरसमज पसरवला जात आहे. या देशाला स्वातंत्र्य मिळविण्यात सर्व जातीधर्मातील लोकांचा सहभाग आहे.

अन्वर राजन यांनी सुत्रसंचलन केले., प्रविण सप्तर्षी
लक्ष्मीकांत देशमुख यांनी आभार मानले.

चौकट

विविध विचारधारांचा बंधुभाव हेच खरे भारतीत्व आहे. विशिष्ठ जाती धर्माला लक्ष्य करून मानवा मानवात भेद, तिरस्कार करणारांनी मनी सद्भाव बाळगावा. शांतता व समृध्दीसाठी बंधुभाव वाढविण्याची गरज आहे असा वैचारीक सुर गांधी भवन येथे झालेल्या रोजा इफ्तार कार्यक्रमात व्यक्त करण्यात आला.

फोटो

रोजा इफ्तार कार्यक्रमात विचार मांडताना प्रा. जस्मिन सय्यद. यावेळी व्यासपीठावर लक्ष्मीकांत देशमुख, शेख करिमुद्दीन, प्रशांत जगताप, अँड. अभय छाजेड. रमेश आढाव, ॲड गोपाळ गुणाले , पैगंबर शेख. यशराज पारखी, युनूसभाई तांबटकर, तसेच अनेक मुस्लिम समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
36.2 ° C
36.2 °
36.2 °
33 %
2kmh
6 %
Wed
36 °
Thu
41 °
Fri
42 °
Sat
42 °
Sun
42 °

Most Popular

Recent Comments