34.8 C
New Delhi
Thursday, June 18, 2026
Homeमनोरंजनपुण्यात २२ मार्चला ‘अशाही असतात प्रेमकविता’चा अनोखा काव्यप्रयोग

पुण्यात २२ मार्चला ‘अशाही असतात प्रेमकविता’चा अनोखा काव्यप्रयोग

पुणे –

 “प्रेमाशिवाय जगाला पर्याय नाही… अस्सल, वास्तव आणि भावनिक गुंतागुंत असलेली वेगळी अनुभूती… आणि ‘तरी आम्ही बोलू नये… भारतीय असल्याच्या जाणिवेतून’ अशा अंतर्मुख करणाऱ्या विचारांची गुंफण असलेला ‘अशाही असतात प्रेमकविता’ हा दिशादर्शक काव्यप्रयोग पुणेकर रसिकांच्या भेटीला येत आहे.

प्रेमाच्या विविध छटा, त्यातील भावनिक गुंतागुंत आणि वास्तववादी अनुभवांचा अनोखा संगम या काव्यप्रयोगातून उलगडणार आहे.

रविवार, २२ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता हा विशेष कार्यक्रम रंगणार असून रसिकांना प्रेमाच्या वेगळ्या आणि संवेदनशील भावविश्वाचा अनुभव देण्याचा प्रयत्न यातून केला जाणार आहे.माधव पटवर्धन सभागृह, महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रोड, पुणे येथे हा काव्यप्रयोग सादर होणार असून रमणी प्रेझेंट्स, पुणे यांच्या वतीने त्याचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाची निर्मिती व संकल्पना कवी आकाश आप्पा सोनवणे यांची असून कार्यक्रमाचे सूत्रधार सुमित गुणवंत असणार आहेत.

या काव्यप्रयोगात कवी संदेश कर्डक, सुमित गुणवंत, रमणी बबिता आकाश, हृदयमानव अशोक आणि स्वराज समुद्र हे आपल्या कवितांमधून प्रेमाच्या विविध पैलूंना स्पर्श करणार आहेत. शब्दांच्या या प्रवासाला आशिष आणि करण यांच्या सुरेल संगीताची साथ लाभणार असून त्यामुळे कार्यक्रमाला भावनिक आणि कलात्मक रंगत येणार आहे.

कार्यक्रमासाठी प्रवेश मोफत असला तरी उपस्थित राहण्यासाठी नोंदणी आवश्यक आहे. इच्छुकांनी पोस्टरवरील QR कोड स्कॅन करून नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

शब्द, भावना आणि संगीत यांचा संगम घडवणारा हा काव्यप्रयोग पुणेकर रसिकांसाठी एक वेगळी आणि संस्मरणीय साहित्यिक मेजवानी ठरणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
scattered clouds
34.8 ° C
34.8 °
34.8 °
37 %
0.5kmh
33 %
Wed
35 °
Thu
41 °
Fri
42 °
Sat
43 °
Sun
42 °

Most Popular

Recent Comments