34.8 C
New Delhi
Thursday, June 18, 2026
Homeमहाराष्ट्रकलाकार कट्टा कायम ठेवण्याची मागणी; पँथर संघटनेचे आयुक्तांना निवेदन

कलाकार कट्टा कायम ठेवण्याची मागणी; पँथर संघटनेचे आयुक्तांना निवेदन

पुणे –

शहराच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक असलेल्या “पुणे कलाकार कट्टा”च्या अस्तित्वाबाबत निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर पँथर संघटनेच्यावतीने पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. कलाकार कट्टा कायमस्वरूपी जतन करून त्याला अधिकृत मान्यता द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पुणे कलाकार कट्टा हा कवी, लेखक, चित्रकार, नाट्यकर्मी आणि विविध कलावंतांसाठी मुक्त अभिव्यक्तीचे प्रभावी व्यासपीठ आहे. नवोदित तसेच प्रस्थापित कलाकारांना येथे आपली कला सादर करण्याची, सामाजिक विषयांवर संवाद साधण्याची आणि वैचारिक देवाणघेवाण करण्याची संधी मिळते. त्यामुळे हा कट्टा पुण्याच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग बनला आहे. तसेच, कलाकार कट्टा हा अनेक कलाकारांच्या उपजीविकेचे साधन असल्याचेही निवेदनात अधोरेखित करण्यात आले आहे. चित्रप्रदर्शन, पुस्तक विक्री, लघुनाट्य सादरीकरण आदी माध्यमांतून कलाकारांना आर्थिक आधार मिळत असून कट्टा बंद झाल्यास त्यांच्या रोजगारावर गदा येण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
कलाकारांना सुरक्षित व सुसज्ज वातावरण मिळावे यासाठी संबंधित ठिकाणी नियमित स्वच्छता, पुरेशी बसण्याची व्यवस्था, प्रकाशयोजना व सुरक्षेची सोय करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.पुण्याच्या सांस्कृतिक वारशाचे संरक्षण करण्यासाठी सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा पँथर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. हे निवेदन पँथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय नडगेरी यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आले.

यावेळी विशाल आदमाने (युवा अध्यक्ष, पुणे जिल्हा), राजवर्धन कांबळे (युवा अध्यक्ष, पुणे शहर), सचिन जाधव (उपाध्यक्ष, पुणे जिल्हा), तुषार परदेशी (युवा उपाध्यक्ष, पुणे शहर), प्रदीप परदेशी (उपाध्यक्ष, कोथरूड विधानसभा) आणि संघशिल भद्रे (स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, पुणे) उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
scattered clouds
34.8 ° C
34.8 °
34.8 °
37 %
0.5kmh
33 %
Wed
35 °
Thu
41 °
Fri
42 °
Sat
43 °
Sun
42 °

Most Popular

Recent Comments