दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित “दुर्गाशक्ती सन्मान सोहळा २०२६” ऑटो क्लस्टर ऑडिओटोरियम चिंचवड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा अॅड. सौ. जया उदय सामंत होत्या.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा अॅड. सौ. जया उदय सामंत आमदार मा. उमा ताई खापरे, मा. डॉ. रोहिणी सोमनाथ पाटील, मा. डॉ. वर्षा सुपे, मा. प्रा. डॉ.मृदुला दाढे, मा. अर्चना शर्मा कोठारी, मा. डॉ.वर्षा सुपे , मा. विनायक भावे यांची उपस्थिती लाभली. यावर्षीचा 2026 दुर्गाशक्ती पुरस्कार मा .जयाताई उदय सामंत . मा डॉ रोहिणी पाटील मा संगीतकार डॉ मृदुला दाढे उद्योजिका मानसी घारे. मा. सोनाली निघोजकर मा सुविधा कडलग आणि शैक्षणिक क्रीडा आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक महिलांना मी दुर्गा पुरस्काराने इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष श्री अभय भोर आणि श्री विनायकजी भावे यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात आले
या सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा दुर्गाशक्ती पुरस्कार मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते देऊन सन्मान करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते कु. दुर्गा अभय भोर (राष्ट्रीय अध्यक्षा, दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्ष) यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
महिला दिनानिमित्त कार्यक्रमामध्ये उपस्थित महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच विजेत्या महिलांना पैठणी व इतर आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित राहून महिला शक्तीचा उत्साहपूर्ण आविष्कार घडवून आणला पाहुण्यांचे स्वागत . दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षातर्फे राष्ट्रीय अध्यक्ष दुर्गा भोर यांनी केले भविष्यातही दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षाच्या राज्यभरात शाखा निर्मिती करून महिलांसाठी सुरक्षा औद्योगिक रोजगार असेच प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात येतील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
दुर्गाशक्ती सन्मान सोहळा उत्साहात संपन्न
RELATED ARTICLES
New Delhi
overcast clouds
32.1
°
C
32.1
°
32.1
°
59 %
3.6kmh
93 %
Sun
36
°
Mon
37
°
Tue
36
°
Wed
36
°
Thu
28
°


