34.1 C
New Delhi
Sunday, May 31, 2026
HomeTop Five Newsआषाढी यात्रेच्या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी केली विविध ठिकाणची पाहणी

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी केली विविध ठिकाणची पाहणी

*वाखरी पालखी तळ, भक्ती सागर (65 एकर), दर्शन रांग, दर्शन मंडप व नदी पात्राची पाहणी

 पंढरपूर :- आषाढी शुद्ध एकादशी सोहळा २५ जुलै २०२६  रोजी होणार असून, या सोहळ्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम  पालखी सोहळ्याबरोबर  तसेच अन्य संताच्या पालखी सोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात. वारी कालावधीत येणा-या वारकरी भाविकांना अधिकच्या  सुविधा उपलब्ध व्हाव्यात या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी विविध ठिकाणची पाहणी केली.

 

यावेळी त्यांनी वाखरी पालखी तळावर पालखी सोहळे तसेच वारकरी भाविकांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची माहिती घेतली. यामध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता, आपत्कालीन कक्ष, विद्युत व्यवस्था, शौचालय आदी बाबतची माहिती घेऊन सूचना केल्या. तसेच भक्ती सागर येथे वारकरी भाविकांना देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती घेतली.वारी कालावधीत गर्दी वर नियंत्रण ठेवण्यासाठी  वाखरी येथे वॉच टॉवर उभे करावेत तसेच भक्ती सागर (६५ एकर) येथे  हायमास्टची संख्या वाढवावी, तसेच पायाभूत सुविधा सहज आणि सोप्या पद्धतीने भक्तांना मिळाव्यात. याबाबतच्या महत्त्वपूर्ण अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. 
   यावेळी प्रांताधिकारी सचिन इथापे , उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख,  सहाय्यक पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके,कार्यकारी अभियंता अमित निमकर, तहसीलदार सचिन लंगुटे, , जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, गटविकास अधिकारी अमोल जाधव, मुख्याधिकारी महेश रोकडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, वैद्यकीय अधधिक्षक डॉ. सरडे, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वहाने,तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

वाखरी पालखी तळ, भक्ती सागर (65 एकर), नदीपात्र या ठिकाणी प्रशासनाकडून भाविकांना देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती प्रांताधिकारी सचिन इथापे व मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली. तसेच मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी आषाढी यात्रा कालावधीत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने असल्याने मंदिर समितीकडून दर्शन रांगेत विश्रांती कक्ष स्थापन करण्यात येतात तसेच दर्शन रांगेतील भाविकांचे दर्शन जलद व सुलभ व्हावे यासाठी करण्यात येणारे नियोजनाची तसेच देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली त्याचबरोबर प्रस्तावित दर्शन मंडप बाबतची माहिती त्यांनी यावेळी दिली.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व संवर्धनाचे कामे पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, सदर कामाची पाहणी कार्तिकेयन एस. यांनी केली.यावेळी जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी वाखरी पालखी तळ, विसावा मंदिर, भक्ती सागर (65 एकर), रिद्धी सिद्धी दर्शन मंडप, दर्शन रांग, स्काय वॉक, चंद्रभागा वाळवंट, ज्ञानेश्वर दर्शन मंडप तसेच मंदिर व मंदिर परिसराची पाहणी केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
scattered clouds
34.1 ° C
34.1 °
34.1 °
43 %
4.1kmh
40 %
Sun
34 °
Mon
38 °
Tue
41 °
Wed
43 °
Thu
42 °

Most Popular

Recent Comments