39.4 C
New Delhi
Sunday, June 21, 2026
HomeTop Five Newsपुणे जिल्हा काँग्रेसची पुनर्रचना

पुणे जिल्हा काँग्रेसची पुनर्रचना

शिरूर व बारामतीसाठी स्वतंत्र दोन जिल्हाध्यक्ष

politics News | पुणे : काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने पुणे जिल्ह्यात मोठे फेरबदल करण्यात येणार आहेत. यानुसार आता एकाऐवजी दोन स्वतंत्र जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात येणार असून, येत्या दहा दिवसांत या पदांची घोषणा होण्याची शक्यता आहे. political शिरूर आणि बारामती या दोन विभागांसाठी स्वतंत्र नेतृत्व नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार महाराष्ट्रात ‘संघटन सृजन अभियान’ राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत पुणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीची पुनर्रचना करण्यात येत असून, त्यासाठी नियुक्त निरीक्षकांनी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधून आढावा घेतला आहे.politics

या संदर्भात काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे निरीक्षक योगेश एच. सी., प्रफुल्ल गुडदे पाटील, रामहारी रूपनवर, प्रशांत जगताप (prashant jagatap), अनंत मोहोद, विश्वजित हाप्पे, देविदास भन्साळी तसेच पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण उपस्थित होते. यावेळी योगेश एच. सी. यांनी दोन जिल्हाध्यक्ष नियुक्त करण्याचा निर्णय जाहीर केला.

या निर्णयानुसार शिरूर आणि बारामती या दोन भागांसाठी स्वतंत्र जिल्हाध्यक्ष नेमले जाणार आहेत. शिरूर विभागासाठी १०, तर बारामती विभागासाठी ५ इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. नव्या रचनेत शिरूर विभागात शिरूर, जुन्नर, आंबेगाव, खेड आणि मावळ या तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. तर बारामती विभागात बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर, भोर आणि खडकवासला या तालुक्यांचा समावेश करण्यात येणार आहे.

निरीक्षकांनी जिल्ह्यातील १३ तालुक्यांचा चार दिवस दौरा करून स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रमुख नेत्यांशी संवाद साधला. त्यांच्या सूचना व अभिप्रायांच्या आधारे जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले असल्याची माहिती योगेश एच. सी. यांनी दिली. (congress)

या निर्णयामुळे पुणे जिल्ह्यात काँग्रेसचे संघटन अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्थानिक पातळीवर प्रभावी नेतृत्व निर्माण करून पक्षाला आगामी निवडणुकांसाठी सक्षम करण्याचा पक्षाचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. नव्या नियुक्त्यांमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, जिल्ह्यात काँग्रेसला नवसंजीवनी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
39.4 ° C
39.4 °
39.4 °
25 %
2.8kmh
0 %
Sun
41 °
Mon
41 °
Tue
42 °
Wed
42 °
Thu
42 °

Most Popular

Recent Comments