‘Sound of Love’ कॉन्सर्टद्वारे Darshan Raval १० मे रोजी पुण्यात प्रेमाची जादू उधळणार – जाणून घ्या खास माहिती
Darshan Raval यांच्या आवाजाच्या प्रेमात पुन्हा एकदा पडण्यासाठी सज्ज व्हा! लोकप्रिय गायक दरशन रावल त्यांचा लाईव्ह कॉन्सर्ट ‘Sound of Love’ रविवारी, १० मे रोजी पुण्यात घेऊन येत आहेत. सायंकाळी ६ वाजता कोथरूड येथील Pethkar Ground येथे हा संगीतसोहळा रंगणार असून सर्व वयोगटातील प्रेक्षकांसाठी खुला आहे. या कार्यक्रमाची तिकिटे BookMyShow वर उपलब्ध आहेत.
‘Sound of Love’ या नावाप्रमाणेच हा कॉन्सर्ट दरशन रावल यांच्या चाहत्यांसाठी अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे. आपल्या रोमँटिक गाण्यांमधून त्यांनी गेल्या काही वर्षांत संगीतविश्वात वेगळी ओळख निर्माण केली आहे. Mehrama, Tera Zikr, Is Qadar, Mahiye Jinna Sona, Preet Re यांसारख्या सुपरहिट गाण्यांनी त्यांनी प्रेमगीतांना एक नवी दिशा दिली आहे. त्यांच्या सुरेल आवाजाने आणि भावपूर्ण सादरीकरणाने प्रत्येक कॉन्सर्टला एक खास जादू मिळते, आणि ‘Sound of Love’मध्येही चाहत्यांना तसाच अविस्मरणीय संगीत अनुभव मिळणार आहे.
याशिवाय, Darshan Raval त्यांच्या नव्या गाण्याच्या रिलीजसाठीही सज्ज आहेत. ‘Only Mine’ हे त्यांचे नवीन गाणे प्रेमाच्या तीव्र आणि भावनिक भावनांवर आधारित असून, दरशन यांनी त्याला त्यांचे “आजवरचे सर्वात passionate love song” असे म्हटले आहे. हे गाणे ९ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.


