36.8 C
New Delhi
Sunday, July 19, 2026
Homeमहाराष्ट्रविद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी करिअर मार्गदर्शन उपक्रम

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी करिअर मार्गदर्शन उपक्रम

कोकण मराठा नवनिर्माण संस्थेचा स्तुत्य पुढाकार

पुणे : कोकण मराठा नवनिर्माण सेवाभावी सामाजिक संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि करिअर विकासाला चालना देण्यासाठी विशेष करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदाशिव पेठ येथील स्काऊट ग्राउंडवर ३१ मे २०२६ रोजी पार पडलेल्या या उपक्रमाला विद्यार्थी, पालक आणि समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

इयत्ता सातवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित या कार्यक्रमात शिक्षण, करिअर नियोजन आणि अभ्यासातील अडचणींवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून कुमार क्लासेस, कोथरूडचे संचालक प्रा. उदय कुमार (एम.टेक.) उपस्थित होते.

प्रा. उदय कुमार यांनी विद्यार्थ्यांमधील गणित विषयाविषयीची भीती दूर करण्यासाठी विविध उदाहरणे आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून प्रभावी मार्गदर्शन केले. गणिताचा अभ्यास सुलभ पद्धतीने कसा करता येतो, आत्मविश्वास कसा वाढवायचा आणि अभ्यासात सातत्य कसे राखायचे याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना उपयुक्त सूचना दिल्या. विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे निरसन करून त्यांनी त्यांना सकारात्मक दृष्टीकोन स्वीकारण्याचा सल्ला दिला.

यावेळी विद्यार्थ्यांच्या यशामध्ये पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगताना त्यांनी पालकांनाही मार्गदर्शन केले. विशेषतः मोबाईल फोनच्या वाढत्या वापरामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होणारे परिणाम आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालकांनी कोणती खबरदारी घ्यावी याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी घरातील वातावरण आणि पालकांचा सहभाग किती आवश्यक आहे, यावरही त्यांनी भर दिला.

कार्यक्रमास समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक प्रकाश भिकू मोरे, तानाजी शिंदे, कृष्णा कदम तसेच साई केमिकल, लोटे-खेडचे संचालक गणेश मोरे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष यश शिंदे, सचिव संदीप चव्हाण, कार्याध्यक्ष राजन जाधव, सहसचिव महेश जाधव, खजिनदार रोहित मोरे, सहखजिनदार मनीष चव्हाण, चार्टर्ड अकाउंटंट प्रसाद सकपाळ, उपाध्यक्ष संतोष भोसले व नितीन मोरे यांच्यासह संस्थेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

तसेच प्रविण कदम, सागर निकम, किशोर हळदे, मंगेश हळदे, निखिल मोरे, विकास चव्हाण, सतीश मोरे, ज्ञानेश शिंदे, वीनेश मोरे, रोहित मोरे आणि ऋषिकेश मोरे यांनीही कार्यक्रमाच्या नियोजन आणि अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे अध्यक्ष यश शिंदे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवर, पालक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानण्यात आले. तसेच सर्व उपस्थितांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.

विद्यार्थ्यांना योग्य दिशा, प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम समाजातील युवकांच्या भविष्यासाठी निश्चितच उपयुक्त आणि प्रेरणादायी ठरला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढून त्यांच्या करिअर घडविण्यासाठी भक्कम पाया तयार होण्यास मदत होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
36.8 ° C
36.8 °
36.8 °
35 %
3.2kmh
79 %
Sun
40 °
Mon
37 °
Tue
30 °
Wed
35 °
Thu
35 °

Most Popular

Recent Comments