28.7 C
New Delhi
Monday, July 20, 2026
Homeमहाराष्ट्रएमव्हीपीएमच्या किर्तिश्री काबरा विद्यालयाचे केले औपचारिक उद्घाटन

एमव्हीपीएमच्या किर्तिश्री काबरा विद्यालयाचे केले औपचारिक उद्घाटन

किर्तिश्री काबरा फाउंडेशनचे पाठबळ लाभलेली ही एक आधुनिक काळातील सीबीएसई शाळा

नागपूर,- : अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा विकसित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकत लक्ष्मीनारायण मंदिर शैक्षणिक संकुलात एमव्हीपीएमच्या किर्तिश्री काबरा विद्यालयाचे (सीबीएसई शाळा) अधिकृतपणे उद्घाटन सोलापूर मध्ये करण्यात आले. जून २०२६ पासून शाळेची सुरुवात नर्सरी ते इयत्ता ७ वी पर्यंत करण्यात येत असून टप्प्याटप्प्याने इयत्ता १२ वी पर्यंत विस्तार करण्याची योजना संस्थेकडून आखण्यात आली आहे.

या भव्य उद्घाटन सोहळ्याला प्रसिद्ध आर्थिक तज्ज्ञ आणि परोपकारी श्री. आनंद राठी यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती, ज्यांनी या विद्यालयाचे रीतसर उद्घाटन केले. हा कार्यक्रम किर्तिश्री काबरा फाउंडेशनचे मुख्य दाते आणि विश्वस्त श्री. श्रीगोपाल काबरा आणि श्रीमती किर्ति काबरा यांच्या आदरणीय उपस्थितीत पार पडला, ज्यांच्या पाठबळाने हा प्रकल्प प्रत्यक्षात उभारण्यात आला.

या सोहळ्याला माहेश्वरी विद्या प्रचारक मंडल (एमव्‍हीपीएम)चे अध्यक्ष, विश्वस्त आणि प्रमुख सदस्यांसह स्थानिक आमदार (एमएलए), खासदार (एमपी) आणि इतर प्रमुख कॉर्पोरेट दाते यांसारखे ज्येष्ठ मान्यवर उपस्थित होते.

एमव्‍हीपीएमच्‍या या संकुलात अनेक आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत, ज्यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे:
•कम्युनिकेशन लॅब (एलएसआरडब्‍ल्‍यू स्किल्स, वक्तृत्व कौशल्य)
•सायन्स एक्सपिरियन्स सेंटर (विज्ञान अनुभव केंद्र)
•स्ट्रीम लॅब (एआय-एमएल, रोबोटिक्स, ड्रोन टेक्नॉलॉजी, एआर/व्‍हीआर, इत्यादी)
•अॅस्ट्रॉनॉमी (खगोलशास्त्र) आणि इस्रो लॅब
•पॉडकास्ट रूम (कंटेंट मेकिंग, कम्युनिटी एंगेजमेंट आणि ब्रॉडकास्ट स्टुडिओ)
•अत्याधुनिक वर्गखोल्या
•स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, एनपीएव्ही क्रीडा मैदान, सभागृह आणि खुल्‍या छताचे नाट्यगृह (ओपन-एअर अॅम्‍फीथिएटर)

श्रीमती किर्ति काबरा म्हणाल्या किर्तिश्री काबरा फाउंडेशनमध्ये आमचा विश्वास आहे की, शिक्षणाची संधी आणि सन्मान हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचा मूलभूत हक्क असावा. किर्तिश्री काबरा विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा, दर्जेदार शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी आवश्यक वातावरण उपलब्ध करून दिले जाईल, ज्यामुळे त्यांना प्रगतीच्या नव्या संधी मिळतील. जवळपास ९७ वर्षांचा समृद्ध वारसा लाभलेल्या एमव्हीपीएम संस्थेच्या सहकार्याने हा प्रकल्प साकारताना आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो. दर्जेदार शिक्षणासोबत विद्यार्थ्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्व विकासासाठी योगदान देण्याचा आमचा प्रयत्न कायम राहील,”

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
28.7 ° C
28.7 °
28.7 °
69 %
1.8kmh
100 %
Mon
29 °
Tue
30 °
Wed
30 °
Thu
31 °
Fri
34 °

Most Popular

Recent Comments