34.1 C
New Delhi
Tuesday, June 2, 2026
Homeक्रीड़ा'अमॅच्युअर कबड्डी फाऊंडेशन ऑफ महाराष्ट्र’च्या कार्याध्यक्षपदी पुनीत बालन यांची निवड

‘अमॅच्युअर कबड्डी फाऊंडेशन ऑफ महाराष्ट्र’च्या कार्याध्यक्षपदी पुनीत बालन यांची निवड

कार्यकारी सभेत सर्वानुमते ठराव मंजूर

पुणे – ‘अमॅच्युअर कबड्डी फाऊंडेशन ऑफ महाराष्ट्र’च्या कार्याध्यक्षपदी (Acting President) युवा उद्योजक पुनीत बालन यांची निवड करण्यात आली आहे. फाऊंडेशनच्या विशेष कार्यकारी सभेत या निवडीचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

‘अमॅच्युअर कबड्डी फाउंडेशन ऑफ महाराष्ट्र’ची वार्षिक सभा पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे पार पडली. सपना वाघमोडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि भारती जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सभेला संस्थेचे पदाधिकारी आणि विविध क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

या सभेत संस्थेच्या भविष्यातील वाटचालीबाबत सखोल चर्चा करण्यात आली. संघटनेला अधिक सक्षम, गतिमान आणि पारदर्शक करण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या. याच पार्श्वभूमीवर अनुभवी आणि कार्यक्षम नेतृत्व म्हणून पुण्यातील युवा उद्योजक आणि ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष पुनीत बालन यांच्यावर कार्याध्यक्ष (Acting President) पदाची जबाबदारी सोपविण्यात आली.

पुनीत बालन हे महाराष्ट्रातील क्रीडा विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेले व्यक्तिमत्त्व असून विविध क्रीडा स्पर्धा, लीग आणि युवक उपक्रमांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या अनुभवामुळे क्रीडा व्यवस्थापनातील त्यांची समज अधिक मजबूत मानली जाते. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील कबड्डी खेळाला अधिक संघटित, पारदर्शक आणि व्यावसायिक दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी सभेत सर्वांनीच व्यक्त केला. या निवडीमुळे नव्या तंत्रज्ञानाचा वापर, खेळाडूंना संधी, स्पर्धांचे प्रभावी आयोजन आणि संघटनेची विश्वासार्हता वाढविणे या बाबींवर विशेष भर देण्यात येईल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. तसेच उपस्थित मान्यवरांनीही बालन यांच्या निवडीचे स्वागत करत त्यांच्या नेतृत्वामुळे संघटनेला नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

या निवडीच्या मांडण्यात आलेल्या ठरावाला सुचक म्हणून सातारा येथील ज्ञानेश काळे तर छत्रपती संभाजीनगर येथील गोकुळ तांदळे अनुमोदक होते. सर्वानुमते हा ठराव मंजूर करण्यात आला. आगामी काळात राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी स्पर्धांच्या आयोजनात संघटनेच्या माध्यमातून अधिक सक्रिय भूमिका बजाविण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
————-..

“‘अमॅच्युअर कबड्डी फाऊंडेशन ऑफ महाराष्ट्र’ने कार्याध्यक्ष पदाच्या माध्यमातून माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल सर्व पदाधिकारी आणि सदस्यांचे मनापासून आभार. कबड्डी हा आपल्या मातीतला खेळ असून त्याला राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर अधिक बळकटी देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. आगामी काळात पारदर्शकता, व्यावसायिक नियोजन आणि नव्या संधींच्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. तळागाळातील तिभेला योग्य व्यासपीठ मिळण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील.”

  • पुनीत बालन
    (कार्याध्यक्ष, अमॅच्युअर कबड्डी फाऊंडेशन ऑफ महाराष्ट्र’
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
34.1 ° C
34.1 °
34.1 °
43 %
3.6kmh
40 %
Tue
37 °
Wed
43 °
Thu
43 °
Fri
43 °
Sat
42 °

Most Popular

Recent Comments