32.5 C
New Delhi
Thursday, July 23, 2026
HomeTop Five Newsदिवंगत अजितदादांच्या विचारांचा वारसा जपणे हीच खरी आदरांजली : रोहन सुरवसे पाटील

दिवंगत अजितदादांच्या विचारांचा वारसा जपणे हीच खरी आदरांजली : रोहन सुरवसे पाटील

राष्ट्रवादीचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी

पवार यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

पुणे, :”दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी शिक्षण, ग्रामीण विकास, पायाभूत सुविधा आणि सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. समाजातील प्रत्येक घटकाला विकासाच्या प्रवाहात आणण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न होता. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे आणि आर्थिक अडचणीमुळे कोणाचेही शिक्षण थांबू नये, ही त्यांची भूमिका होती. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करणे हीच त्यांना खरी आदरांजली आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाला प्राधान्य देऊन प्रामाणिक परिश्रम, शिस्त आणि संस्कार यांच्या बळावर आपल्या आयुष्यात यश मिळवावे.” असे मनोगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी व्यक्त केले.(ncp)

गोपाळकृष्ण प्राथमिक विद्यामंदिर, गोखलेनगर येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आंगणवाडी ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रोहन सुरवसे पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल तसेच इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी सुरवसे बोलत होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी रोहन सुरवसे पाटील यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. त्यानंतर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही यावेळी अजित पवार यांच्या कार्याला आदरांजली वाहिली. शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री कासार, मंदाकिनी बलकवडे,उपक्रमशील शिक्षक रणजित बोत्रे उपस्थित होते

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
light rain
32.5 ° C
32.5 °
32.5 °
54 %
5.1kmh
12 %
Thu
35 °
Fri
36 °
Sat
34 °
Sun
39 °
Mon
38 °

Most Popular

Recent Comments