30.5 C
New Delhi
Tuesday, March 3, 2026
Homeमाहिती तंत्रज्ञानक्रिकेट हंगामामुळे महानगरांशिवाय इतर शहरांमध्ये पर्यटनाला चालना

क्रिकेट हंगामामुळे महानगरांशिवाय इतर शहरांमध्ये पर्यटनाला चालना

प्रमुख आयोजक शहरांमध्ये मुक्कामासाठी जागांचा शोध वाढू लागल्याचे चित्र


भारतातील सुमारे ६०% जेन झी २०२६ मध्ये थेट क्रिकेट सामने पाहण्यासाठी प्रवास करण्याची योजना आखत आहेत.

पुणे, : भारतातील आगामी क्रिकेट हंगामात देशांतर्गत प्रवासात लक्षणीय वाढ होत आहे. नवीन एअरबीएनबी माहितीनुसार मागील काही वर्षांत सामन्यांचे आयोजक असलेल्या विशेषतः महानगरांपलीकडील शहरांमध्ये मागणीनुसार शोध आणि बुकिंगमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसते आहे.

मागणी महानगरांपलीकडे वाढते आहे
एप्रिल आणि मे या कालावधीत महत्त्वाच्या स्पर्धांना सुरूवात होत असताना प्रवासासाठी मुक्कामाच्या ठिकाणांची मागणी रांची, तिरुवनंतपुरम, जयपूर आणि लखनऊ अशा उदयोन्मुख क्रिकेट केंद्रांमध्ये वाढू लागली आहे. त्यातून खेळाचे प्रमुख क्षण भारताच्या पर्यटन नकाशात कशा रितीने बदल घडवतात हे दिसते.

एअरबीएबीच्या अंतर्गत माहितीनुसार क्रिकेट हंगामात अनेक क्रिकेट सामन्यांच्या आयोजक शहरांसाठी भारतीय प्रवाशांनी केलेल्या शोधांत मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत रांचीमध्ये १२० टक्के , तिरुवनंतपुरममध्ये ११० टक्के , जयपूर ७० टक्के आणि लखनौमध्ये ६० टक्य्यांपेक्षा जास्त लक्षणीय वाढ झाली आहे.

महत्त्वाच्या सामन्यांच्या दिवशी मागणीत मोठी वाढ झाली
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या सप्ताहात (१४-१७ फेब्रुवारी २०२६) यजमान शहर कोलंबोमध्ये भारतीयांनी मुक्कामासाठी केलेल्या शोधांमध्ये ३२५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली. तसेच, क्रिकेट विश्वचषक शेवटच्या टप्प्यापूर्वी (७-१० मार्च २०२६) अहमदाबादमधील शोधांमध्ये जवळजवळ १७० टक्के वाढ झाल्याचे दिसले. त्यामुळे महत्त्वाच्या सामन्यांदरम्यान महत्त्वाचे क्रिकेट स्थान म्हणून या शहराचे स्थान मजबूत झाले.

एअरबीएनबीच्या सर्वेक्षणात असे दिसून आले की भारतातील सुमारे ६० टक्के जेन झीच्या मते ते २०२६ मध्ये थेट क्रिकेट सामन्यांना उपस्थित राहण्यासाठी प्रवास करण्याची योजना आखत आहेत आणि ७० टक्के मित्र किंवा कुटुंबासह उपस्थित राहणे पसंत करतात. क्रिकेट भारताच्या जेन झीला विशिष्ट शहराकडे आकर्षित करत असले तरी, त्यांचा प्रवास सामान्यतः सामन्याच्या दिवसापलीकडे विस्तारला जातो. छोट्या, एकमेव उद्देशाच्या भेटींसोबतच हे प्रवास पर्यटनासाठीही आयोजित केले जातात. सुमारे निम्मे पर्यटक (५३ टक्के ) स्थानिक संस्कृती, पाककृती आणि स्थानिक लोकांचा अनुभव घेण्यासाठी सामन्याच्या दिवसांसोबत इतर दिवसांसाठी सहलींचे नियोजन करतात. क्रिकेट सामन्यासाठी सामान्यतः ३-४ दिवस प्रवास केला जातो. त्यातून संस्कृती समजून घेणे आणि अनुभव घेणे महत्त्वाचे मानले जाते असे दिसते.

एअरबीएनबीचे भारत आणि आग्नेय आशियाचे राष्ट्रीय प्रमुख अमनप्रीत सिंग बजाज म्हणाले की , “क्रिकेट हा देशातील जनतेचा आत्मा ठरला आहे. आता हीच ऊर्जा प्रवासामध्ये रूपांतरित होत असल्याचे दिसते आहे. त्यात चाहते खेळाभोवती अर्थपूर्ण प्रवासाचे नियोजन करतात. हे क्षण फक्त स्टेडियमपुरते मर्यादित राहत नाहीत. लोक निवासाचा कालावधी वाढवतात, मित्र आणि कुटुंबासह प्रवास करतात एअरबीएनबीवर आम्ही हा बदल प्रत्यक्ष पाहत आहोत, कारण प्रवासी अशी घरे निवडतात जिथे त्यांना एकत्र राहता येते.

भारताची पर्यटन परिसंस्था जसजशी विकसित होत आहे, तसतसे क्रिकेटचा प्रवास पारंपरिक शहरांच्या पलीकडे विस्तारित होत आहे. चाहते महत्त्वाच्या सामन्यांसाठी प्रवास करत असताना आणि सामन्याच्या सप्ताहाशेवटी मुक्कामाचे नियोजन करत असताना त्याचा फायदा स्थानिक हॉटेल आणि इतर वातावरणाला मदत करणाऱ्या यजमान शहरांपर्यंत पोहोचत आहे आणि भौगोलिकदृष्ट्या व्यापक पर्यटनाच्या मागणीत योगदान देत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
30.5 ° C
30.5 °
30.5 °
9 %
5.6kmh
2 %
Tue
35 °
Wed
37 °
Thu
38 °
Fri
38 °
Sat
38 °

Most Popular

Recent Comments