30.1 C
New Delhi
Friday, May 1, 2026
HomeTop Five Newsएमआयटी-एडीटी विद्यापीठाला ‘डास्का’ मानांकन

एमआयटी-एडीटी विद्यापीठाला ‘डास्का’ मानांकन

एआय व डेटा सायन्स अभ्यासक्रमांसाठी मिळाला आंतरराष्ट्रीय दर्जा; ठरले महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ



पुणे : एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाला (एमआयटी-एडीटी) डेटा सायन्स कौन्सिल ऑफ अमेरिका (DASCA) यांचे मानांकन प्राप्त झाले असून, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि डेटा सायन्स क्षेत्रातील उच्च दर्जाच्या शिक्षणासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. या मानांकनासह विविध एआय व डेटा सायन्स अभ्यासक्रमांसाठी ‘डास्का’ मान्यता मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ ठरण्याचा मान ‘एमआयटी-एडीटी’ला मिळाला आहे.
हे मानांकन ११ पदवी, ३ पदव्युत्तर तसेच पीएच.डी. स्तरावरील संगणक शास्त्र आणि अभियांत्रिकी / माहिती तंत्रज्ञान या शाखेतील अभ्यासक्रमांना प्रदान करण्यात आले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा अ‍ॅनालिटिक्स, क्लाऊड कॉम्प्युटिंग, सायबर सिक्युरिटी, ब्लॉकचेन आणि इंटेलिजंट सिस्टिम्स या आधुनिक डेटा सायन्स व एआयच्या मूलभूत तंत्रज्ञान क्षेत्रांचा यात समावेश आहे.


‘डास्का’ मानांकन जागतिक दर्जाच्या अभ्यासक्रम रचना, शैक्षणिक गुणवत्ता आणि उद्योगाभिमुखतेशी सुसंगतता सिद्ध करणाऱ्या संस्थांनाच प्रदान केले जाते. हे मानांकन डेटा-आधारित अर्थव्यवस्थेच्या बदलत्या गरजांनुसार विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानासह शिक्षण देणाऱ्या जागतिक स्तरावरील संस्थांना बहाल केले जाते.
या मानांकनामुळे डास्काच्या ‘वर्ल्ड डेटा सायन्स अँड एआय इनिशिएटिव्ह’ (डब्ल्यूडीएसएआय) अंतर्गत जागतिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी विद्यापीठाला मिळणार असून, प्राध्यापक प्रशिक्षण, संशोधन सहकार्य आणि सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापनेस चालना मिळणार आहे.
एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी विद्यापीठाच्या या जागतिक यशाबद्दल आनंद व्यक्त करताना म्हटले की, विज्ञान, तंत्रज्ञान आणि मानवी मूल्यांचा समन्वय साधणारी शिक्षण व्यवस्था उभारण्याचा एमआयटी-एडीटी विद्यापीठाचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. भारतातील विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील कौशल्याधिष्ठित शिक्षण पुरविण्याचा आमचा मानस असून, डास्का मानांकनामुळे त्या प्रयत्नांना मोठे बळ मिळाले आहे.
विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा प्र-कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी ही कामगिरी शैक्षणिक उत्कृष्टता आणि नवोपक्रमाच्या सातत्यपूर्ण वाटचालीचे प्रतीक असून, मिळालेले हे मानांकन सन्मानासोबतच जबाबदारी वाढविणारे देखील असल्याचे नमूद केले.
या मानांकनासाठी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., एनईपी, रँकिंग व मानांकन अधिष्ठाता प्रा. डॉ. विरेंद्र शेटे, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, डॉ. गणेश पाठक, डॉ. श्रद्धा फणसळकर आणि डॉ. राकेश सिद्धेश्वर यांचे विद्यापीठ व्यवस्थापनाकडून अभिनंदन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
30.1 ° C
30.1 °
30.1 °
54 %
3.6kmh
0 %
Fri
35 °
Sat
42 °
Sun
41 °
Mon
40 °
Tue
39 °

Most Popular

Recent Comments