43.1 C
New Delhi
Tuesday, May 26, 2026
HomeTop Five Newsपुणे स्थानकात थरार!

पुणे स्थानकात थरार!

‘वंदे भारत’चा डबा रुळावरून घसरला; मोठा अनर्थ टळला

पुणे : वंदे भारत एक्सप्रेसला पुणे स्थानकाजवळ प्रवेश करताना अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबईहून सोलापूरकडे धावणाऱ्या या गाडीचा एक कोच फलाटावर येत असताना अचानक रुळांवरून घसरल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटून सोलापूरकडे जात होती. पुणे स्थानकातील फलाट क्रमांक ३ वर गाडी येत असतानाच हा प्रकार घडला. डब्याची चाके रुळांवरून खाली घसरल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली असून, मोठा अपघात टळल्याने सुटकेचा निःश्वास सोडण्यात आला.

घटनेनंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घसरलेला कोच पुन्हा रुळावर आणण्यासाठी तांत्रिक पथकाकडून युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले आहे. या घटनेचा परिणाम पुणे स्थानकावरील रेल्वे वाहतुकीवर झाला असून, काही गाड्या उशिराने धावत आहेत.

अपघातानंतर स्थानक परिसरात प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, रेल्वे विभागाकडून सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
few clouds
43.1 ° C
43.1 °
43.1 °
10 %
3.1kmh
20 %
Tue
44 °
Wed
46 °
Thu
47 °
Fri
45 °
Sat
42 °

Most Popular

Recent Comments