23.1 C
New Delhi
Tuesday, April 14, 2026
HomeTop Five News‘महापौर चषक राष्ट्रीय शरीरसौष्ठ व स्पर्धा २०२६’ चे रविवारी महापौर रवि लांडगे...

‘महापौर चषक राष्ट्रीय शरीरसौष्ठ व स्पर्धा २०२६’ चे रविवारी महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते उद्घाटन….

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे होणार स्पर्धा….

पिंपरी,- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन, महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने व पिंपरी चिंचवड अमेच्यूर बॉडी बिल्डिंग असोसिएशन यांच्या सहकार्याने महापौर चषक राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धा २०२६ चे आयोजन चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन रविवार, २९ मार्च २०२६ रोजी दुपारी १२:३० वाजता महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते होणार आहे.

या कार्यक्रमास केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तसेच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती तसेच खासदार मेधा कुलकर्णी, सुप्रिया सुळे, श्रीरंग आप्पा बारणे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, महेश लांडगे, शंकर जगताप, शंकर मांडेकर, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोग सदस्य ॲड. गोरक्ष लोखंडे, महापालिकेचे उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विधी समिती सभापती सुजाता बोराटे, महिला व बालकल्याण समिती सभापती राणी माई पठारे, शहर सुधारणा समिती सभापती संजय नाना काटे, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे, शिक्षण समिती सभापती रविना आंगोळकर तसेच नगरसदस्य शीतल शिंदे, मंदार देशपांडे, नगरसदस्या मधुरा शिंदे, सविता आसवानी यांच्यासह आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे यांच्यासह पिंपरी चिंचवड महापालिकेचे सर्व सन्माननीय नगरसदस्य, नगरसदस्या व अधिकारी यांची उपस्थिती लाभणार आहे.

तसेच या स्पर्धेचा समारोप सोहळा सोमवार, ३० मार्च २०२६ रोजी रात्री ८ वाजता संपन्न होणार आहे. तरी महापौर चषक राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धा २०२६ च्या उद्घाटन व समारोप या दोन्ही कार्यक्रमांना तसेच या संपूर्ण स्पर्धेला क्रीडाप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महानगरपालिकेचे क्रीडा,कला,साहित्य व सांस्कृतिक समितीचे सभापती कैलास कुटे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
23.1 ° C
23.1 °
23.1 °
46 %
2.1kmh
0 %
Tue
38 °
Wed
39 °
Thu
40 °
Fri
41 °
Sat
41 °

Most Popular

Recent Comments