32.6 C
New Delhi
Tuesday, July 28, 2026
HomeTop Five Newsमोशीतील ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प यशस्वी

मोशीतील ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प यशस्वी

कचरा व्यवस्थापनासाठी दुसऱ्या प्रकल्पाचे नियोजन

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मोशी येथे उभारण्यात आलेल्या कचऱ्यापासून वीज निर्मिती (वेस्ट टू एनर्जी) प्रकल्पामुळे दररोज मोठ्या प्रमाणात सुक्या कचऱ्याची विल्हेवाट लावली जात असून, हा प्रकल्प यशस्वी ठरला आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे आणि कचऱ्याच्या वाढत्या प्रमाणामुळे भविष्यातील समस्या टाळण्यासाठी महापालिकेने सार्वजनिक-खासगी भागीदारी (डीबीओटी) तत्त्वावर आणखी एक प्रकल्प उभारण्याचे नियोजन केले आहे.

शहरातील घरोघरातून संकलित होणारा कचरा मोशी येथील डेपोत जमा केला जातो. गेल्या ३५ वर्षांपासून येथे साचलेल्या कचऱ्यामुळे सुमारे ८१ एकर क्षेत्रावर कचऱ्याचे डोंगर निर्माण झाले आहेत. या डोंगरांचे बायोमायनिंगद्वारे निर्मूलन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सध्या शहराची लोकसंख्या ३३ लाखांच्या पुढे गेली असून, दररोज सुमारे १४०० टन कचरा निर्माण होत आहे. कचरा समस्या अधिक गंभीर होऊ नये यासाठी महापालिकेने घनकचरा व्यवस्थापनासाठी विविध प्रकल्प राबविले आहेत. त्यामध्ये कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प प्रभावी ठरल्याने त्याचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या प्रकल्पाद्वारे दररोज सुमारे एक हजार टन सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करून सुमारे २७ मेगावॅट वीज निर्मिती केली जाते. तसेच १५०० टन क्षमतेचे मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी (एमआरएफ) केंद्रही कार्यरत आहे. या प्रकल्पासाठी महापालिकेचा सुमारे २०० कोटी रुपयांचा सहभाग असून, एकूण प्रकल्प खर्च अंदाजे १०५० कोटी रुपये आहे.

नवीन प्रकल्पासाठी केंद्र व राज्य शासनाकडे निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांनी दिली. या उपक्रमामुळे भविष्यात कचरा व्यवस्थापन अधिक सक्षम होईल आणि शहरात कचरा समस्या निर्माण होणार नाही, असा विश्वास पर्यावरण विभागाने व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
very heavy rain
32.6 ° C
32.6 °
32.6 °
62 %
5kmh
99 %
Tue
35 °
Wed
39 °
Thu
36 °
Fri
35 °
Sat
36 °

Most Popular

Recent Comments